नाशिक येथे संगणक प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा – आधुनिक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
नंदुरबार – महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने नाशिक येथे नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यांतील संगणक प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन ICT प्रोजेक्ट हेड मा. राफिया रेशी मॅडम यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी नाशिक विभाग प्रमुख मा. श्री. अजित धसाडे सर, जिल्हा व्यवस्थापक श्री. दिपक पाठक, तालुका व्यवस्थापक श्री. गिरीष भोई तसेच विभागातील सर्व जिल्हा व तालुका समन्वयक व संगणक शिक्षक उपस्थित होते.
या प्रशिक्षणात संगणक साक्षरता, ई-लर्निंग सॉफ्टवेअरचा उपयोग, ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांतील तफावत भरून काढणे, व शालेय अध्यापनात संगणक व इंटरनेटचा प्रभावी वापर यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यासाठी संगणक शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.
0 Response to "नाशिक येथे संगणक प्रशिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा – आधुनिक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल"
टिप्पणी पोस्ट करा