संपर्क करा

आमच्या बद्दल

 यथार्थ वार्ता चा मुख्य उद्देश लोकांपावेतो महत्वाच्या बातम्या व सूचना पोहचवणे हा आहे. ब्रेकिंग न्यूजच्या या काळात बातम्यांचे तथ्यातील त्या वृत्ताच्या सत्यताशी कुठलीही तळजोड न करता आपल्या पावेतो यथार्थ वृत्त पोहचवणे हीच आमची प्राथमिकता आहे.

            नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. ग्रामीण भागात माहितीची गरज लक्षात घेता ताज्या व महत्वपूर्ण घडामोडी साध्या व सोप्या भाषेत लोकापावेतो पोहचवून त्यांना अपडेट ठेवणे हा सुद्धा आमचा उद्देश आहे. बातम्यांच्या माध्यमातून पसरत असलेल्या अफवाना कमी करून लोकांना तार्किकदृष्ट्या जागरूक करून समाजात एक उत्तम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.

              या न्यूज साईटच्या माध्यमातून तळोदा तालुक्यातील लहान- मोठ्या अश्या सर्वच महत्वाच्या सूचना अथवा बातम्याना आपल्या पावेतो पोहचविण्याचे कार्य 'यथार्थ वार्ता' तथा त्यांचा संघ करेल..

             या साईट मध्ये आपणास फक्त अन फक्त तळोदा तालुक्यातील बातम्या भेटतील. तळोदा तालुक्यातील संबधीत पोलीस ठाण्यातील क्राईम, राजकारण, ताज्या घडामोडी, खेळ इत्यादी बातम्या मिळविण्यासाठी आपण आमच्याशी कनेक्ट राहा. 

            कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना आणि विचारधारांशी संलग्नता नसलेला व निःपक्षपणे जनहितार्थ हा ब्लॉग चालविला जात आहे. आम्ही कोणत्याही अतिशयोक्ती तसेच अंधश्रद्धा विषयाशी सहमत नाहीत, यदा कदाचित असे वृत्त प्रसारित झाले तर तो केवळ विरंगुळा समजावा....
मुख्य संपादक - 
श्री.सुधाकर मराठे 
+919595008844


0 Response to "आमच्या बद्दल"

टिप्पणी पोस्ट करा