तळोदा : वडिलांना रात्री बेरात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जाताना पाहून 15 वर्षीय तरुणाने कोरोना कालावधीत लागू केलेल्या ताळेबंदीत फावल्या वेळेचा सदपयोग करून स्वतः ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून कोडिंगचे धडे घेऊन स्वयंमचलीत डिव्हाई तयार केले. ज्यामुळे घर बसल्या वेळापत्रक निश्चित करून शेतात पाणी देण्यासाठी मोटार सुरू व बंद करता येणार आहे. या डिव्हाईसचा परिसरातील इतर शेतकऱ्यांना देखील लाभ होणार आहे.
तळोदा येथील डॉ.सूर्यकांत व स्नेहल पंजराळे यांच्या 15 वर्षाच्या मुलगा योग पंजराळे याने लॉकडाऊनच्या कालावधीत संगणकीय कोडिंग शीकुन त्याचे वडील डॉ. सूर्यकांत पंजराळे यांना शेतात ये-जा करण्याचा ताण कमी व्हावा यासाठी एक डिव्हाईस तयार केले आहे. वडिलांना आठवड्यातून दोन ते तीनदा रात्री बेरात्री शेतात जाऊन मोटार सुरू करून पिकांना पाणी देऊन सिंचनास सक्षम करावे लागत होते. त्यामुळे ते अगदीच कंटाळवाणे काम झाले होते. शिवाय रात्री बेरात्री 5 ते 8 किमी दूर आपल्या शेतात जाण्यासाठी वन्य प्राण्यांची भीती देखील कायम होती.
योग यास संगणकीय आवड असल्याने त्याने 2020 च्या कोविड कालावधीत लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीतील रिकामा वेळाचा सदपयोय करून अतिरिक्त कौशल्ये विकसित करण्याचा निर्णय घेतला व ऑनलाइन कोडींगचे धडे घेणे सुरू केले. काही कालावधीत कोर्स संपल्यानंतर त्याने वडिलांना रात्री आरोग्य धोक्यात घालून शेतात जाऊन पिकाना पाणी द्यावे लागत असल्याचे पाहून यावर काहीतरी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला व ऑनलाईन पद्धतीने शिकलेल्या कोडिंग कोर्सच्या मदतीने एक डिव्हाइस आणि एक अॅप तयार केले. ज्यामुळे वडिलांना घराबाहेर न पडता घर बसल्या पाण्याची मोटरीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे.
सदर डिव्हाइस एका मोबाईल अॅपवर ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. यापूर्वी देखील अश्या पद्धतीचे डिव्हाइस इतरांकडून तयार करण्यात आले आहेत. मात्र ते मोबाईल अथवा सिम बेस डिव्हाईस आहेत. जे स्वयंचलित नसून त्यांना बंद अथवा सुरू करण्यासाठी हाताळावे लागते. मात्र योगने तयार केलेले डिव्हाईमध्ये वेळापत्रक निश्चित करता येते. ज्यात पुढील आठवड्याचे महिन्याचे, वर्षाचे नियोजन करून वेळापत्रक निश्चित करून सेट करता येऊ शकते. जे स्वयंचलित ठरविलेल्या वेळेवर सुरू अथवा बंद करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ताण कमी होऊन त्यांना या डिव्हाईसचा फायदा होणार आहे. योगचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून शेतकऱ्यांकडून त्या डिव्हाईसची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान योगने तयार केलेल्या डिव्हाईसमुळे कोडिंग शिकवणाऱ्या एका संस्थेकडून योगची निवड करण्यात आली असून सिलिकॉन व्हॅलीत पुढील प्रशिक्षणासाठी त्याला बोलविण्यात आले आहे.
प्रतिक्रिया***
माझे वडील फक्त एक स्विच दाबण्यासाठी अर्धा तास फेरी मारत होते. शिवाय, रात्री शेतात साप किंवा इतर प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने ते शेतातून परत येईपर्यंत कुटुंबातील लोक काळजीत पडायचे. यावर मार्ग काढण्यासाठी सदर डिव्हाईसची निर्मिती केली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शिवाय पाण्याची देखील बचत होण्यास मदत होणार आहे. यापुढे देखील शेतकऱ्यांना उपयुक्त असे डिव्हाईस तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
योग पंजराळे
डिव्हाईस निर्माता
0 Response to "वडिलांना रात्री बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने 15 वर्षीय मुलाने बनवले स्वयंचलित डिव्हाईस"
टिप्पणी पोस्ट करा