श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनला आंतरराष्ट्रीय रक्तवीर सन्मान!
नंदुरबार : येथील श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनला 'मध्यप्रदेश रक्तदान सेवा गृप' व 'ऑल इंडिया ब्लड मोटिवेटर्स, इटारसी' तर्फे आंतरराष्ट्रीय रक्तवीर सन्मान - 2025 ने गौरविण्यात आले. ही संस्था सोशल मिडियाच्या माध्यमातून कार्यरत असून, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या साहाय्याने रक्तदात्यांची साखळी निर्माण केली आहे. जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यास, गरजूंना वेळेत रक्त मिळावे यासाठी संस्थेकडून वेळोवेळी आवाहन केले जाते. या आवाहनानंतर रक्तदाते तात्काळ पुढे सरसावतात, ज्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. रक्तदान या महान कार्याची साखळी संस्थेने सोशल मिडियाच्या माध्यमातून सक्षमपणे उभी केली आहे.
इटारसी (म.प्र.) येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचे सदस्य अरुण साळुंखे आणि रामकृष्ण पाटील यांनी सन्मान स्वीकारला. या वेळी खासदार दर्शन सिंह चौधरी, डॉ. सीतासरन शर्मा, पंकज चौरे, डॉ. आर. के. चौधरी, डी. एस. पी. एम. अभिषेक अग्रवाल आणि आयोजक आशिष अरोरा उपस्थित होते. संस्थेच्या या कार्यात महेंद्र झवर, जीवन माळी, अजय देवरे, हितेश कासार, सुधीरकुमार ब्राम्हणे, पो.कॉ. अभय राजपूत आदींचे योगदान उल्लेखनीय आहे.
0 Response to "श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनला आंतरराष्ट्रीय रक्तवीर सन्मान!"
टिप्पणी पोस्ट करा