महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी
तळोदा : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान दिनांक १३ ते २५ एप्रिल दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रारंभाचा भाग म्हणून भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रा. विलासजी डामरे सर यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा तर्फे करण्यात आले होते. यावेळी जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा. विलास डामरे, माजी नगराध्यक्षा मा. सौ. हेमलता डामरे, सुभाषजी जैन, सुरेश माळी, कलीम अन्सारी, योगेश मराठे, अंबालाल साठे, जगदीश परदेशी, श्रावण तिजवीज, संदीप साळी, अविनाश मराठे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सर्व उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत त्यांना अभिवादन केले.
0 Response to "महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी"
टिप्पणी पोस्ट करा