
ब्रेक फेल झाल्याने पिकअप उलटली चांदसैली घाटात अपघात: आठ जखमी; तिघे गंभीर
तळोदा: चांदसेली घाटात पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने वाहन उलटून घडलेल्या अपघातात तीन जण गंभीर तर इतर पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अवकाळी पाऊस सुरू असल्याने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गुजरात राज्यात मजुरीसाठी गेलेले मजूर पिकअप वाहनाने (क्र. एमएच ०२ वायए ७२७६) घरी परतत होते. साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास चांदसैली घाटात अचनाक समोरुन वाहन येत असल्याने ब्रेक फेल झाले. त्यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले.
उतारावर भरधाव वेगाने येणारे वाहन चांदशैली घाटाच्या डोंगराच्या कडाला आदळले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. त्यामुळे कठडे तोडून गाडी खाई जाण्याची शक्यता होती. अपघातात वतनसिंग विक्रमसिंग पाडवी (वय ३२), सोर्न धीरसिंग पराडके (वय ६), मनीषा धीरसिंग पराडके (वय ४), विश्रांती धीरसिंग पराडके (वय ३), पूजा प्रकाश वळवी (वय १९) शितल दिज्या पाडवी (वय १५), यमुन वतन पाडवी (वय २९) व फुलसिंग बार पाडवी (वय ६५) हे आठ जण जखम झाले आहेत. याप्रकरणी फेंदा बाबा वळव यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्य फिर्यादीवरुन वाहन चालक दिपप्रकाश दिपक वळवी याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Response to "ब्रेक फेल झाल्याने पिकअप उलटली चांदसैली घाटात अपघात: आठ जखमी; तिघे गंभीर"
टिप्पणी पोस्ट करा