संपर्क करा

बसस्थानकसह बाजार पेठेत माथेफिरूचा अचानक हल्ला: रस्त्यावरची सुरक्षा धोक्यात, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बसस्थानकसह बाजार पेठेत माथेफिरूचा अचानक हल्ला: रस्त्यावरची सुरक्षा धोक्यात, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तळोदा : शहरातील मुख्य बस स्थानकावर एका माथेफिरू व्यक्तीने प्रवाशांवर अचानक हल्ला करून गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. संबंधित व्यक्तीच्या बोलीभाषेवरून तो पंजाबमधील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांच्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

        सकाळच्या सुमारास प्रवासी बस स्थानकावर उभे असताना, त्या माथेफिरू व्यक्तीने अचानक एका प्रवश्यावर हल्ला चढवला. हल्ला पाहून इतर प्रवाशांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधितांने त्यांच्यावरही शिवीगाळ करत हल्ला केला. यामुळे काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

         या हल्ल्यानंतर माथेफिरूने बस स्थानकाजवळील नाश्त्याच्या दुकानांमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याने शिवीगाळ करत दुकानदारांना धमकावले काही वेळ त्यांचा व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे स्थानक परिसरात खळबळ उडाली. 

         शहरातील मुख्य रस्त्यावर माथेफिरू व्यक्तीने ये-जा करणाऱ्या नागरिकांना विनाकारण शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले सदर घटनेनंतर काही जणांवर हात उचलून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे काही नागरिक घाबरून इतरत्र पळू लागले. घटनेदरम्यान, काही नागरिकांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने अधिक आक्रमक होत त्यांनाही शिवीगाळ व हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. स्थानिक नागरिकांनी त्यास हाकलून लावले. त्यानंतर पोलीस वाहन दखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांना चकमा देत तो फरार झाला. त्याच्या हालचालीवरून तो मानसिक अस्थिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या बोली भाषेवरून तो पंजाबमधील असल्याचे समजते. 

      या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानकावरील अशा प्रकारांमुळे सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर बस स्थानक परिसरातील सुरक्षेची गंभीर उणीव समोर आली आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी प्रशासनाकडे तक्रार करत सुरक्षेची व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची करून कारवाई करणार असल्याचे म्हणाले. 

        या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांनी सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करणे आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक पावले उचलणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया 
      या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.  "कोणालाही काहीही न विचारता केलेली ही मारहाण आणि शिवीगाळ अनपेक्षित होती. आम्हाला आमच्या सुरक्षेची भीती वाटते."
प्रशांत पाटील

0 Response to "बसस्थानकसह बाजार पेठेत माथेफिरूचा अचानक हल्ला: रस्त्यावरची सुरक्षा धोक्यात, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article