संपर्क करा

जे भल्या भल्याना जमले नाही ते खापर येथील तरुणाने करून दाखवले ;ॲपलने दिले ११ लाखाचे बक्षिस

जे भल्या भल्याना जमले नाही ते खापर येथील तरुणाने करून दाखवले ;ॲपलने दिले ११ लाखाचे बक्षिस

तळोदा : ॲपल कंपनीने अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील एका तरुणाला बक्षीस म्हणून ११ लाख रुपये दिले आहेत. या तरुणाने ॲपल कंपनीला लॅपटॉप सुरक्षतेबाबत त्रुटी शोधून दिली आहे. त्यामुळे कंपनीने याला बक्षीस म्हणून ही रक्कम दिली आहे. त्याच्या या कार्याचे कौतुक होत आहे..

           आजच्या डिजिटल युगात ॲपलचां स्मार्टफोन असो वां अन्य उपकरणे जगभरातील वापरकर्त्यांचा पसंतीचे आहेत. दिसण्यापेक्षा त्यातील सुरक्षेमुळे अनेकांची पसंती ॲपलकडे दिसते. सुरक्षेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या या ॲपल फोनचा सुरक्षेचा त्रुटींचा शोध अक्कलकुवा येथील ओम या तरुणाने लावला आहे. या तरुणाला ॲपल कंपनीकडून १३ हजार ५०० डॉलर म्हणजेच जवळपास ११ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. या तरुणाने ॲपल मधील एक गंभीर चूक शोधून काढली. ओम कोठावडे असे या तरुणाचे नाव असून आश्रम शाळा पेचरी देव ता. अक्कलकुवा येथील मुख्याध्यापक कालिदास विठ्ठल कोठावडे यांच्या तो मुलगा असून त्याचे शिक्षण नंदुरबार येथे झाले असून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो सध्या पुणे येथे शिक्षण घेत आहे...

           ॲपल कंपनीचा  लॅपटॉप मधील डाटा चोरीला जाण्याची भीती ओमला जाणवली त्या अनुषंगाने त्याने शोध सुरू केला. चार महिन्यांपासून अमेरिकेतील ॲपल कंपनीचा संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. यासह ॲपल कंपनीचा सहकाऱ्यांशी बोलून लॅपटॉप स्क्रीन बंद दरम्यान लॅपटॉप मधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याची बतावणी करून त्यावर उपाययोजना सुचवल्या वेळोवेळी हा व्यवहार स्क्रीन शॉटच्या माध्यमातून व मेसेजिंगचा माध्यमातून संबंधित कंपनीला केल्यामुळे ॲपल कंपनीच्या देखील सदरबाब निदर्शनास आली व त्यांनी तात्काळ तसे करून बघितल्यास खरंच डाटा चोरीला जात असल्याची भीती त्यांना निर्माण झाली. ओमने केलेल्या कार्याचे ॲपलने कौतुक केले व आभार मानले आहेत.
        ॲपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, आपण पाठवलेला रिपोर्टसाठी क्वॉलिफाई करण्यात आला आहे. यामुळे ॲपलची समस्या सोडण्यात मदत झाली आहे. तुम्हाला १३.५ हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत आहे. त्याला पाठवण्यात आलेल्या आभार ईमेलमध्ये केवळ अक्कलकुवा तालुका नवे नंदुरबार जिल्हा नवे महाराष्ट्र राज्य नव्हे तर संपूर्ण देशाचा आभार ॲपल कंपनीने मानले आहे.
 
        सदर तरुणाला संगणक हाताडन्यात रुची असल्याने वारंवार विविध शोध या माध्यमातून त्याचे सुरू आहेत . सदर तरुणास आयटी सारख्या क्षेत्रात काम करण्याची त्याची इच्छा असून स्वतःची कंपनी टाकण्याच्या देखील त्याचे म्हणणे असल्याचे त्यांनी त्याच्या वडिलांशी बोलून दाखवले आहे..

0 Response to "जे भल्या भल्याना जमले नाही ते खापर येथील तरुणाने करून दाखवले ;ॲपलने दिले ११ लाखाचे बक्षिस "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article