संपर्क करा

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

तळोदा: सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षांत दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता 12 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. 

महामंडळाकडून ज्येष्ठता व  जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड,  2 पासपोर्ट फोटो, तसेच पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी मूळ कागदपत्रासह आणि दोन छायांकित प्रतीसह कार्यालयात संपर्क साधावा. 

 शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  विकास महामंडळ (मर्या) नंदुरबार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे (दूरध्वनी क्रमांक 02564- 210181) संपर्क साधावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले आहे.



नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.28

0 Response to "अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article