संपर्क करा

ड्रॅगनफ्रुट’ लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

ड्रॅगनफ्रुट’ लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

तळोदा : कृषि विभागाने सन 2021-2022 वर्षांपासून एकात्मिक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ड्रॅगनफ्रुट (कमलम)  लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले असून या फळपिकाची लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

ड्रॅगनफ्रुट हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ असून भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मूल्य इत्यादी बाबी लक्षात घेवून फलोत्पादन विकास अभियानातुन ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चीत केले आहे.   

ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषकतत्व आणि ॲन्टीऑक्सीडंन्टमुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. या व्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शीयम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकुन राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

 ड्रॅगनफ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी जमीनीची पुर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मीटर x 3 मीटर ,3 मीटर x 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदुन खड्याच्या मधोमध सिमेंट कॉक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेंट कॉक्रीट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

ड्रॅगनफ्रुट फळपिकांची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, संरक्षण याबाबीकरीता अनुदान देय असून याकरीता 4 लाख प्रति हेक्टर प्रकल्पमुल्य ग्राह्य धरुन 40 टक्के रक्कम  1 लाख 60 हजार अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तीसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे. 

अधिकाधिक शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार यांनी केले आहे.





नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.28

0 Response to "ड्रॅगनफ्रुट’ लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article