शिवसनातर्फे तळोदा येथील 951 कुटुंबियांना संसारपयोगी साहित्याचे वाटप
तळोदा : शिव संपर्क अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात तळोदा येथील 951 कुटुंबियांना संसारपयोगी साहित्याचे वाटप माजी आम.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसंपर्क अभियान अंतर्गत संसारपयोगी साहित्य व तळोदा येथील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम येथील माळी समाज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाअध्यक्ष आमश्या पाडवी, जिल्हाअध्यक्ष विक्रांत मोरे, माजी जिल्हा प्रमुख दिपक गवते, अरुण चौधरी, नगरसेविका प्रतीक्षा दुबे, माजी नगरसेविका कोमल सोनार, शिवसेना जिल्हा संघटक श्याम वाडीले, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, उपप्रमुख रवींद्र गिरासे, प्रकाश कुलकर्णी, रूपसिंग पाडवी, आकाश वळवी, संजय पटेल, अर्जुन मराठे, माळी समाज पंच अध्यक्ष अरविंद मगरे, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत शिंदे, गुजर समाज पंच अध्यक्ष संजय पटेल, गुरव समाज अध्यक्ष बाबूलाल गुरव, वाणी समाज अध्यक्ष विजय वाणी, बोहरी समाज अध्यक्ष मुर्तुझा बोहरी, भोई समाज अध्यक्ष पिंटू भोई, शिंपी समाज अध्यक्ष सुपडू भांडारकर, सोनार समाज अध्यक्ष घनश्याम सोनार, सराफ असोसिएशनचे प्रसाद सराफ, जोहरी समाज अध्यक्ष प्रकाश जोहरी, कुंभार समाज अश्याक्ष रविंद्र कुंभार, साळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र साळी, धोबी समाजाचे अध्यक्ष कैलास धोबी, नाभिक समाज अध्यक्ष उमेश ठाकरे, ब्राह्मण समाज अध्यक्ष गिरीष अग्निहोत्री, मुस्लिम समाज पंच आसिफ शेख, मौलाना शोएब रजा नुरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, कोरोना काळात शिवसैनिक निस्वार्थ पणे धावून आले. स्वातंत्र्य सैनिकांची आठवण केवळ योद्ध काळात येते मात्र शिवसैनिकांनी त्यांची आठवण केली. गरिबांना संसारपयोगी साहित्य वाटप करणारा पक्ष मुख्यमंत्र्यांचा आहे. इंदिरा गांधीच्या काळात 10 पैसे पेट्रोल वाढले तरी मोर्चे निघत होते. मात्र आता पेट्रोलने 100 गाठली तरी कोणीही रस्त्यावर येत नाही, गौर गरिबांचे हाल कसे होतील याकडे केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच लसीकरण वाढविण्यासाठी सर्वच समाजाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने कोरोनाकाळात केवळ व्यवसाय केला परिणामी नागरिकांना रेमडीसीव्हर सारख्या इंजेक्शनसाठी जीव धोक्यात घालून फिरावे लागले. रेमडीसी वरचा काळा बाजार सर्वत्र झाला. काही पुढाऱ्यांनी एकही रेमडीसीव्हर उपलब्ध करून दिलीं नाही मात्र जनता ओरडायला लागल्या नंतर त्यांना शुद्ध आली. असे म्हणून तळोदा शिवसैनिक यांच्या कार्याचे कौतुक केले. शिवाय कार्यक्रमातील उपस्थित गर्दी पाहून आगामी निवडणुकीत शिवसेनेचे नक्कीच अधिक जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, विक्रांत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान कोकणातील तळई येथे दरळ कोसळून मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आनंद सोनार, विपुल कुलकर्णी, विनोद वंजारी, कल्पेश सूर्यवंशी, श्रावण तिजविज कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले प्रास्ताविक व आभार जितेंद्र दुबे यांनी मानले..
चौकट
कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून तळोदा शहरातील माजी सैनिक गोरख कलाल, रुपसिंग पाडवी, राजेंद्र धोंडू माळी, उदय सूर्यवंशी यांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
0 Response to "शिवसनातर्फे तळोदा येथील 951 कुटुंबियांना संसारपयोगी साहित्याचे वाटप"
टिप्पणी पोस्ट करा