संपर्क करा

झिरी येथे बांबू उद्योग प्रक्रियेस सुरुवात : माजी मंत्री पद्माकर वळवी

झिरी येथे बांबू उद्योग प्रक्रियेस सुरुवात : माजी मंत्री पद्माकर वळवी

तळोदा : सातपुडास पुन्हा हिरवा शालू  नेसवण्याचा संकल्प भारती फाऊंडेशन मोदलपाडा व सातपुडा ग्रीनव्हँली अँग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनीने केले असून तो उल्लेखनीय आहे.  या माध्यमातून 25 लाख रोपे लागवड करण्याचे उद्दिष्टे असून यामुळे नक्कीच संकल्प पूर्ती होणार असल्याचे विश्वास जिप अध्यक्षा सीमा वळवी यांनी झिरी येथे आयोजित बांबू रोपांचा वाटप कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केला..  

            तळोदा तालुक्यातील झिरी (पाठडी) येथे दि.२४ जुलै रोजी भारती फाऊंडेशन मोदलपाडा व सातपुडा ग्रीनव्हँली अँग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी लि.तळोदा यांच्या वतीने बांबू रोप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिप सदस्य सुहास नाईक, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, निशा वळवी, प.स सदस्य सुमन वळवी,  माजी सभापती अक्कलकुवा  शिवराम वळवी, सरपंच नर्मदा नगर पुण्या वसावे, प्रवीण वळवी, सुरेश इंद्रजित, बुधावल सरपंच मंगलसिंग पाटील, शिर्वे सरपंच सर्वर वसावे, मेंढवळचे माजी सरपंच धर्मेंद्र वळवी, माजी उपसभापती प.स दीपक मोरे, उखडू वळवी, किरण पाडवी, केतन वळवी, भारती फौंडेशनचे अध्यक्ष योगिता वळवी, आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बांबू रोपांसह, फळ झाडे असे 5 लाख रोपांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अॅड पद्माकर वळवी हे होते.  सदर रोपांचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड सिमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पर्यावरण संरक्षण करणे व जंगलाची वाढ करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. नंदुरबार जिल्हा हा वातावरण बदल (ग्लोबल वॉर्मिंग) यात संवेदनशील जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. अनेक वर्षांपासून सातपुडा पर्वतीय क्षेत्राच्या आधारे आपल्या भागातील पाऊस समाधानकारक पडत होता. यापूर्वी कधीही पाणी टंचाई व दुष्काळाचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही. आदिवासी भागात जल, जंगल, जमीन संरक्षण व संवर्धन करणे काळाजी गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

           कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री तथा सातपुडा ग्रीन व्हॅलीचे चेअरमन पद्माकर वळवी यांनी सांगितले की, सातपुडा परिसरातील नंदुरबार जिल्ह्यात व शेजारील भागात बांबू व इतर रोपांची लागवड करण्याचे निश्चित केले असून नदी, नाल्याच्या काठावर, पडीत जमिनीत, शेतीच्या बांधावर शेतकरी, युवक, विद्यार्थी, महिला बचत गटांचे कार्यकर्ते व सर्वांनी या वृक्षारोपण चळवळीत सहभाग घेण्याचे आवाहन केले, याशिवाय परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवाय परिसरात झिरी येथे बाबू प्रक्रियेसाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून बांबू प्रक्रिया उद्योग मशिनरी उभारणी झाली आहे. लवकरच उद्योगास शुभारंभ होणार असल्याचे मत  यावेळी त्यांनी व्यक्त केले. कोरोनाचे नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम पार पडला. 


0 Response to "झिरी येथे बांबू उद्योग प्रक्रियेस सुरुवात : माजी मंत्री पद्माकर वळवी"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article