संपर्क करा

नगरपालिका धक्कादायक निकाल ; प्रथमच राष्ट्रवादी पक्षाचा नगराध्यक्ष

नगरपालिका धक्कादायक निकाल ; प्रथमच राष्ट्रवादी पक्षाचा नगराध्यक्ष

तळोदा : नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा अत्यंत धक्कादायक आणि राजकीय समीकरणे बदलणारा निकाल लागला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता, त्या पक्षाने यावेळी थेट नगराध्यक्ष पदासह ११ नगरसेवक निवडून आणत इतिहास घडवला. भाजपमध्ये तिकीट न मिळाल्याने योगेश चौधरी यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पत्नी भाग्यश्री चौधरी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. कोणताही मोठा नेता किंवा आमदार पाठीशी नसताना स्वतःच्या बळावर त्यांनी प्रभावी जनसंपर्क साधत विजय मिळवला.
            भाजप व शिवसेनेकडून दिग्गज नेत्यांच्या सभा होऊनही अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपच्या उमेदवारी नियोजनातील चुका, उशिरा उमेदवार जाहीर होणे आणि अती आत्मविश्वास याचा फटका पक्षाला बसला. शिवसेनेचेही गणित राष्ट्रवादीच्या अचानक एन्ट्रीमुळे बिघडले. या निकालामुळे “थेट नगराध्यक्ष भाजपच जिंकतो” हा समज खोटा ठरला असून भाजप व शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा हा निकाल ठरला आहे.

0 Response to "नगरपालिका धक्कादायक निकाल ; प्रथमच राष्ट्रवादी पक्षाचा नगराध्यक्ष "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article