भाजपचा अभेद्य किल्ला ढासळला : तळोद्यात राष्ट्रवादीची धडक एन्ट्री
भाग्यश्री चौधरी नगराध्यक्ष – राष्ट्रवादी ११, शिवसेना ६, भाजप ४
तळोदा : नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भाग्यश्री चौधरी विजयी झाल्या असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे जितेंद्र सूर्यवंशी व शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. भाग्यश्री चौधरी या ४ हजार ४७३ इतक्या मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाल्यात. तसेच राष्ट्रवादीचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे सहा तर भाजपचे चार नगरसेवक निवडून आलेत. यामुळे एकप्रकारे तळोद्यात राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे.
तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान घेण्यात आले होते. आज रविवारी (ता. २१) येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी पाच टेबलांवर व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मतपेट्यांचा प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री चौधरी (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या असून त्यांना ९८६९ मते मिळाली तर पराभूत जितेंद्र सूर्यवंशी (भाजप) ५३९६ मते, हितेंद्र क्षत्रिय (शिवसेना) ३९३५ मते मिळाली आहेत.
भाजपकडून आमदार राजेश पाडवी व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचे भक्कम पाठबळ असतानाही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. शिवसेनेकडून आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांमुळे प्रचार जोरदार झाला होता; मात्र निकालात शिवसेनेला मर्यादित यश मिळाले..
● प्रभाग क्रमांक १ अ) मधून रामानंद ठाकरे (राष्ट्रवादी) हे विजयी झालेत, त्यांना १६८५ मत मिळालेत. तर पराभूत योगेश पाडवी (भाजप) ५८५ मते, विनोद माळी (शिवसेना) १८२ मते मिळाली. १ ब) मधून भाग्यश्री चौधरी (राष्ट्रवादी) विजयी झाल्या असून त्यांना १६३९ मते मिळाली तर पराभूत गायत्री खाटीक (शिवसेना) २३८ मते, कलु भरवाड (भाजप) ५५३ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक २ अ) मधून शितल पाडवी (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या असून त्यांना १०३० मते मिळाली. तर पराभूत हेमलता डामरे (भाजप) ५०४ मते, तनुजाबाई पाडवी (शिवसेना) १०२० मते मिळाली. ब) मधून अनिता परदेशी (शिवसेना) या विजयी झाल्या असून त्यांना १२३० मते मिळाली. तर पराभूत सानिया अन्सारी (भाजप) ३६८ मते, रूपाली चौधरी (राष्ट्रवादी) ९४८ मते मिळाली. क) मधून इमरान खाटीक (राष्ट्रवादी) हे विजयी झाले असून त्यांना १११९ मते मिळाली. तर पराभूत विकास खाटीक (शिवसेना) ८०४ मते, कैलास चौधरी (भाजप) ४३४ मते, इंद्रीसअली सय्यद (एमआयएम) ३०६ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक ३ अ) मधून जयश्री महाले (भाजप) या विजयी झाल्या असून त्यांना ७६० मते मिळाली. तर पराभूत अरुणा पवार (काँग्रेस) ३६ मते, सिंधू पिंपळे (राष्ट्रवादी) ३८६ मते, शोभा क्षत्रिय (शिवसेना) ४५२ मते मिळाली. ब) मधून अजय परदेशी (भाजप) विजयी झाले असून त्यांना ७७४ मते मिळाली. तर पराभूत विकासगीर गोसावी (शिवसेना) २९३ मते, विकास महाले (राष्ट्रवादी) ३८२ मते, भूषण क्षत्रिय (अपक्ष) २०५ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक ४ अ) मधून प्रतिभा पाडवी (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या असून त्यांना ५८८ मते मिळाली तर पराभूत कल्पना पाडवी (शिवसेना) ५६४ मते, वसुबाई पाडवी (भाजप) ३६१ मते मिळाली. ब) मधून शेख नदीम शेख युनुस (शिवसेना) हे विजयी झाले असून त्यांना ५८१ मते मिळाली. तर पराभूत शेख रईस शेख लुकमान कुरेशी (भाजप) यांना ४२५ मते, अमन जोहरी (राष्ट्रवादी) यांना ५०६ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक ५ अ) मधून कल्पेश चौधरी (राष्ट्रवादी) हे विजयी झाले असून त्यांना ८८६ मते मिळाली. तर पराभूत जगदीश भोई (शिवसेना) ७२३ मते, आनंद सोनार (भाजप) ४६१ मते मिळाली. ब) मधून प्रतीक्षा दुबे (शिवसेना) विजयी झाल्या असून त्यांना ११५१ मते मिळाली. तर पराभूत रत्ना भोई (राष्ट्रवादी) ५९५ मते, हेतल भोई (भाजप) ३२२ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक ६ अ) मधून हर्षाबाई पाडवी (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या असून त्यांना ५३३ मते मिळाली. तर पराभूत प्रकांत ठाकरे (काँग्रेस) १२२ मते, धनराज पाडवी (शिवसेना) ४९१, सुरेश पाडवी (भाजप) ५१७ मते मिळाली. ब) मधून गायत्री पिंपरे (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या असून त्यांना ६७१ मते मिळाली. तर पराभूत अंबिका शेंडे (भाजप) ५१२ मते, मनीषा सूर्यवंशी (शिवसेना) ४७९ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक ७ अ) मधून शिरीषकुमार माळी (भाजप) हे विजयी झाले असून त्यांना ८८९ मते मिळाली. तर पराभूत दीपक चौधरी (राष्ट्रवादी) ८१४ मते, गणेश राणे (शिवसेना) २६९ मते मिळाली. ब) मधून रत्ना चौधरी (भाजप) या विजयी झाल्या असून त्यांना ८०१ मते मिळाली तर पराभूत सयना उदासी (शिवसेना) ४४९ मते, रजनीबाई चौधरी (राष्ट्रवादी) ७०७ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक ८ अ) मधून लक्ष्मी नाईक (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या असून त्यांना ७९० मते मिळाली तर पराभूत आरती पाडवी (शिवसेना) ६८० मते, जमुनाबाई पाडवी (भाजप) ६५६ मते, पुनम पाडवी (काँग्रेस) १०८ मते मिळाली. ब) मधून अनुपकुमार उदासी (शिवसेना) हे विजयी झाले असून त्यांना ११६६ मते मिळाली तर पराभूत संजय पटेल (भाजप) ९५८ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक ९ अ) मधून मोनिका माळी (शिवसेना) या विजयी झाल्या असून त्यांना ९३३ मते मिळाली तर पराभूत सुवर्णा राणे (भाजप) ८५४ मते मिळाली. ब) मधून कपिल कर्णकार (शिवसेना) हे विजयी झाले असून त्यांना १००९ मते मिळाली तर पराभूत गौरव वाणी (भाजप) ७५९ मते मिळाली.
● प्रभाग क्रमांक १० अ) मधून अरविंद प्रधान (राष्ट्रवादी) हे विजयी झाले असून त्यांना ५८५ मते मिळाली तर पराभूत नरेश पाडवी (शिवसेना) २३१ मते, विवेक पाडवी (भाजप) ५२६ मते मिळाली. ब) मधून मिराबाई कोळी (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या असून त्यांना ६३७ मते मिळाली तर पराभूत वैशाली चव्हाण (शिवसेना) २३२, अपर्णा माळी (भाजप) ४६७ मते मिळाली.
हुतात्मा चौकापासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यावर हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, यशवंत पाडवी, मोहन शेवाळे, रतन पाडवी, जगदीश चौधरी, प्रभाकर चौधरी, रत्ना चौधरी, घनश्याम चौधरी, यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, मोठ्या प्रचार, खर्च व प्रतिष्ठेच्या लढतीनंतर तळोदा नगर परिषदेत स्पष्ट सत्ताबदल घडून आला असून, नव्या राष्ट्रवादी नेतृत्वाकडून विकासाभिमुख कारभाराच्या अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत...
*कमी फरकाने निवडणूक आलेले उमेदवार*
नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये काही प्रभागांत नगरसेवक पदासाठीचे निकाल अत्यंत कमी मतांच्या फरकाने ठरले. प्रभाग क्रमांक २ (अ) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल लक्ष्मण पाडवी (१०३०) यांनी शिवसेनेच्या तनुजाबाई नरेश पाडवी (१०२०) यांचा फक्त १० मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ४ (अ) मध्ये राष्ट्रवादीच्या प्रतिभा दिपक पाडवी (५८८) यांनी शिवसेनेच्या कल्पना सुखदेव पाडवी (५६४) यांना २४ मतांनी मात दिली, तर त्याच प्रभागातील ब गटात शिवसेनेचे शेख नदीम शेख युनुस (५८१) यांनी राष्ट्रवादीचे अमन मोहन जोहरी (५०६) यांचा ७५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ६ (अ) मध्ये राष्ट्रवादीच्या हर्षाबाई मनोज पाडवी (५३३) यांनी भाजपचे सुरेश महादू पाडवी (५१७) यांना १६ मतांनी हरवले. प्रभाग क्रमांक ७ (ब) मध्ये भाजपच्या रत्ना सुभाष चौधरी (८०१) यांनी राष्ट्रवादीच्या रजनीबाई कांतीलाल चौधरी (७०७) यांचा ९४ मतांनी पराभव केला. या निकालांवरून मतदारांचा कौल अनेक ठिकाणी अत्यंत सूक्ष्म फरकाने ठरल्याचे स्पष्ट झाले आहे...
तळोदा मतमोजणीचा वेग आणि उमेदवारांची नाराजी
तळोदा नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी सकाळी ठरलेल्या वेळेनुसार सुरू झाली, तरी ५३ टपाली मतदान मोजण्यासाठी ५५ मिनिटांचा वेळ लागला. यामुळे काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये नाराजी दिसून आली. शहादा व नंदुरबार पालिकेच्या निकाल निम्म्यापेक्षा जास्त जाहीर झाल्यानंतरही तळोदा शहरातील निकाल संत गतीने बाहेर येत होते. कडक पोलिस बंदोबस्त असूनही मतमोजणी प्रक्रियेत काही विलंब जाणवत होता. उमेदवार, कार्यकर्ते व नागरिक सर्वजण निकालाकडे उत्सुक होते, त्यामुळे वातावरण ताणतणावाचे होते, तरी निकाल शांततेत जाहीर करण्यात आला..
प्रतिक्रिया
राष्ट्रवादी पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांनी विजयाचे श्रेय मतदारांना दिले. त्यांनी सांगितले की, माझ्या मागे कोणताही आमदार किंवा वक्ता नसताना मी स्वतः भाषण केले. निवडणूक दरम्यान सर्व सामान्य मतदारांचा मनात मी होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवले. हा विजय माझा नाही, तर तळोदा शहरातील मतदारांचा आहे. विशेषतः आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
योगेश चौधरी
पॅनल प्रमुख राष्ट्रवादी
प्रतिक्रिया
लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आम्ही तो तळा जाऊ देणार नाही. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक काम करू. हा विजय माझा नाही, तर प्रत्येक मतदारांचा आहे, ज्यांनी आमच्यावर प्रेम व पाठबळ दिले.
भाग्यश्री चौधरी
नगरध्यक्ष
0 Response to "भाजपचा अभेद्य किल्ला ढासळला : तळोद्यात राष्ट्रवादीची धडक एन्ट्री"
टिप्पणी पोस्ट करा