के. आर. पब्लिक स्कूलमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नंदुरबार: श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कूल, ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायकोमेट्रिक टेस्ट व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-निवडी आणि क्षमतांनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या चर्चासत्राच्या प्रमुख वक्त्या सौ. कृती काबरा मॅडम (करिअर गाईडन्स समन्वयक) यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध कोर्स, नोकरीच्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या वाटचालीतील अडचणी यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार योग्य क्षेत्र निवडण्यास मदत करण्यासाठी सायकोमेट्रिक टेस्टही घेण्यात आली. प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी सौ. कृती काबरा मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शिबिरात इयत्ता 8वी, 9वी आणि 11वी च्या सुमारे 100 विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभाग घेतला. पालकांनाही त्यांच्या मुलांच्या भवितव्याविषयी आवश्यक माहिती देण्यात आली. भारतात उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधी आणि त्यांच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे चेअरमन श्री किशोरभाई वाणी, व्हा. चेअरमन श्री सिद्धार्थभाई वाणी, डायरेक्टर सौ. केतकी वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा आणि उपप्राचार्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
0 Response to "के. आर. पब्लिक स्कूलमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन"
टिप्पणी पोस्ट करा