संपर्क करा

तळोदा नगरपरिषदेची करवसुली मोहीम – 2 दुकाने सील

तळोदा नगरपरिषदेची करवसुली मोहीम – 2 दुकाने सील

तळोदा : नगरपरिषदेच्या करवसुली मोहिमेअंतर्गत थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. 17 फेब्रुवारी रोजी भिका रेवा भरवाड (कॉलेज रोड, तळोदा) यांच्याकडील एकूण 80,558 रुपये थकीत मालमत्ता व मिळकत करापैकी 50,000 रुपये वसूल करण्यात आले. उर्वरित रक्कम न भरल्यामुळे त्यांची दोन दुकाने सील करण्यात आली.

नगरपरिषदेकडून वारंवार सूचना देऊनही काही नागरिकांनी कर भरला नाही. त्यामुळे कठोर उपाययोजनांचा अवलंब करत नळजोड तोडणे, मालमत्ता जप्त करणे आणि थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यासारख्या कारवाया सुरू आहेत.

जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या निर्देशानुसार नगरपरिषदेने ही विशेष करवसुली मोहीम राबवली आहे. याअंतर्गत, मोठ्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येत असून, देय रक्कम तातडीने न भरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

      ही कारवाई प्रशासकीय अधिकारी कमलेश काळे, कर निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत सचिन अग्रवाल, सचिन कोळेकर, लखन कंद्रे, सुशील बोदडे, सनी ठाकरे, राजेंद्र माडी, मनमोहन सूर्यवंशी, दिगंबर माळी आणि अश्विन परदेशी उपस्थित होते. नागरिकांनी वेळेत कर भरावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी केले आहे.

0 Response to "तळोदा नगरपरिषदेची करवसुली मोहीम – 2 दुकाने सील"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article