
विकासासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे तळोद्यात सर्वपक्षीय नेत्यांचे चर्चासत्र
तळोदा : सामाजिक,शैक्षणिक,पायाभूत सुविधा व कोणत्याही प्रकारच्या विकास करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी आपले राजकीय मतभेद विसरून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येणे गरजेचे असल्याच्या सूर तळोद्यात आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला.
शहर विकासाच्या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांचे असणारे दृष्टिकोन,आगामी काळात असणारी पालिका निवडणूक, संभाव्य राजकीय बदल शहरातील विकास व समस्या आदी विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या 'राजकीय गप्पा' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी, भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, नगरसेवक संजय माळी, जितेंद्र सूर्यवंशी, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, युवा नेते संदीप परदेशी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे,भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी,नगरसेवक हेमलाल मगरे,विश्वनाथ कलाल,पंचायत समिती उपसभापती विजय राणा, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आनंद सोनार, सुरज माळी, जगदीश चौधरी, कल्पेश सूर्यवंशी, कल्पेश माळी, विपूल कुलकर्णी, तसेच शिंदे गटाचे गौतमचंद जैन, अनुपकुमार उदासी, जगदीश परदेशी आदिसह सर्वपक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात तळोदा शहरात आतापर्यंत झालेले विकास कामे कामांची गुणवत्ता शहराच्या औद्योगिक विकास नवीन वसाहतीत प्रलंबित असणारे विकास कामे मागील जाहीरनामात समावेश असणाऱ्या बाबी राजकीय नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा वास्तव व त्या संदर्भातील भविष्यातील वाटचाल आदी विषयांवर साधक वादक वातावरणात चर्चा करण्यात आली नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी शहर विकासाच्या संदर्भात असणाऱ्या सर्व प्रश्नांना चर्चासत्रात उत्तरे दिली.तालुक्याच्या औद्योगिक विकास व स्थलांतर या प्रश्नावर आमदार राजेश पाडवी डॉ.शशिकांत वाणी पद्माकर वळवी,उदेसिंग पाडवी यांनी आपले मत व्यक्त केले. तळोदा शहरात नुकतेच पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना देखील या कार्यक्रमात पक्षांतरा संदर्भात भूमिका स्पष्ट करावी लागली. माजी मंत्री पद्माकर वळवी, उदेसिंग पाडवी यांनी देखिल पुढील काळात पक्षांतराच्या कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करून चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला आगामी पालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा सर्व घटक पक्षांच्या विचार असून त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा देखील मनोदय महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या चर्चासत्रात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हंसराज महाले प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी व आभार प्रदर्शन सुधाकर मराठे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष ईश्वर मराठे,दीपक मराठे, हंसराज महाले सुशील सूर्यवंशी,भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, विकासदीप राणे, सुधाकर मराठे, किरण पाटील, नरेश चौधरी सम्राट महाजन, सुशिलकुमार सूर्यवंशी नारायण जाधव, महेंद्र लोहार, महेंद्र सूर्यवंशी, दिपक गोसावी आदिनी परिश्रम घेतले.
चौकट
सर्व पक्ष नेते एकाच मंचावर
विकासाचा मुद्द्यांवर शहरातील राजकीय पक्षाचे राजकीय नेते प्रथमच एका व्यासपीठावर आल्याने व चर्चा घडवून आल्याने शहरात या कार्यक्रमाची एकच चर्चा होती.असा कार्यक्रम तालुका जिल्हा विभाग नवे तर राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणारा असून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा दबाव गट असल्याची भावना अशा कार्यक्रमातून व्यक्त होते अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन होणे गरजेचे असल्याचेही मत मान्यवरांनी व्यक्त केले.
0 Response to "विकासासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे तळोद्यात सर्वपक्षीय नेत्यांचे चर्चासत्र"
टिप्पणी पोस्ट करा