
खडसेंना सर्व पदे त्यांचाच घरात हवी : मंत्री गिरीष महाजन
तळोदा : एकनाथ खडसे यांना सर्व पदे स्वतःचा घरात पाहिजेत तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्यानंतर गिरीष महाजन याचा पत्रकाराची संवाद साधताना खडसेवर केला आरोप.
शहरातील बिरसा मुंडा चौकात उभारण्यात आलेल्या भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामविकास व पंचायत राज,वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवा कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांनी संवाद साधतांना जळगाव जिल्ह्यातील दूध संघ संदर्भात प्रश्न उपस्थित केले.या वेळी ते म्हणाले की जळगाव दूध संघात मोठा घोटाळा झाला आहे येथील एम. डी. संबंधित एम. डी. यांनी कबूल केले आहे की, येथील माल गायब आहे. या ठिकाणी कोट्यावधींची अफरातफर असून त्या संदर्भात तपास सुरू आहे असे सांगत 450 रुपये किलोचे तूप 85 रुपये भावाने विकले गेले आहे.हेही त्यांनी मान्य केले. चौकशी सुरू आहे.तेथील कर्मचाऱ्यांना अटक केली.हा कुठलाही राजकीय दबाव नाही आमदार खडसे हे सर्वच पदे आपल्या घरात पाहिजे अस समजतात असा घणाघाती आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला..
यावेळी त्याच्या सोबत आमदार राजेश पाडवी, आमदार काशीराम पावरा, जि.प अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, किसान मोर्चाचे राज्य चिटणीस राजेंद्रसिंग राजपूत, डॉ. कांतीलाल टाटीया, रूपसिंग पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, आदी उपस्थित होते..
0 Response to "खडसेंना सर्व पदे त्यांचाच घरात हवी : मंत्री गिरीष महाजन"
टिप्पणी पोस्ट करा