तळोदा शहरातील रस्त्यांना विविध महापुरुषांची नावे देण्यात यावीत.- मागणी
तळोदा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा यांच्या वतीने तळोदा नगर परिषदेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय त्याचबरोबर नगरसेविका अनिता परदेशी यांनी व्यापारी संकुल त्याचबरोबर शहरात असलेल्या विविध रस्त्यांच्या नामकरणाबाबत नगर परिषदेच्या सपना वसावा त्याचबरोबर नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोद्याच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन सकाळी ११ वाजेला पक्ष्याच्या कार्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी माहिती देते वेळी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,नगर सेविका अनिता परदेशी, तसेच युवा नेते संदीप परदेशी हे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगरपरिषदेच्या नूतन इमारतीखाली असणाऱ्या व्यापारी संकुलांना 'यहा मोगी माता व्यापारी संकुल' असे नाव देण्यात यावे. कारण याहा मोगी माता ही महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातील आदिवासी बांधवांची कुलस्वामिनी असून सर्व जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे. नंदुरबार हा देखील आदिवासी जिल्हा असून तळोदा शहरात व ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव यांचे वास्तव्य आहे.
या व्यापारी संकुलाला देवी याहा मोगी मातेचे नाव दिले गेल्यास सर्व जाती धर्मातील लोकांसाठी व आदिवासी बांधवांसाठी ही गौरवाची तसेच आनंदाची बाब ठरेल.याबाबतचे निवेदन आम्ही नगरपालिकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी व नगराध्यक्ष यांना सादर केले आहे.
त्याचबरोबर निवेदनात आम्ही स्पष्टपणे मागणी केली आहे की, तळोदा शहर हे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाने समृद्ध व महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. मागील काही वर्षात तळोदा शहर विकासाच्या वाटेवर असून,तळोदा शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यात नवीन मार्ग साकारण्यात आले आहेत.त्यामध्ये शहरात प्रवेश करणारे मार्ग व चौक विकसित करण्यात आलेले आहेत. प्रशस्त रस्ते व चौकांचे सुशोशोभीकरण यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तळोदा शहरातील या विविध चौकांना काही महापुरुष व नेत्यांची नावे दिली गेली आहेत.
त्याच धर्तीवर तळोदा शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील विविध राष्ट्रपुरुष व महापुरुषांचे तसेच नेत्यांची नावे देण्यात यावीत.अशी मागणी आमच्यावतीने निवेदनाद्वारे नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे.
शहरातील विविध मार्गांना विविध महापुरुषांची नावे दिली तर अशी नावे जनतेच्या नेहमी ओठावर राहतील व त्यांच्या कार्याचे स्मरण सगळ्यांच्या मनात राहील. विद्यार्थ्यांना व युवा पिढीला देखील याबाबत प्रेरणा मिळेल तरी नगराध्यक्ष यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून येणाऱ्या सर्वसाधारण सभेत महापुरुषांची नावे विविध रस्त्यांना द्यावीत असा ठराव मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याबाबत निवेदनामध्ये नावेही सुचवले आहेत. त्याप्रमाणे स्मारक चौक ते भगवान बिरसा मुंडा चौक या रस्त्याला *भगवान बिरसा मुंडा मार्ग* असे नाव देण्यात यावे. त्याचबरोबर बिरसा मुंडा चौक ते संत गुलाम महाराज प्रवेशद्वार या रस्त्याला *लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मार्ग* असे घोषित करावे त्याचबरोबर बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली या रस्त्याला *अहिल्याबाई होळकर मार्ग* म्हणण्यात यावे त्याचबरोबर स्मारक चौक ते हातोडा रस्ता प्रवेशद्वार या मार्गाला *छत्रपती शिवाजी महाराज मार्ग* संबोधण्यात यावे त्याचबरोबर स्मारक चौक ते कॉलेज चौफुली *भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम मार्ग* असे गौरविण्यात यावे., त्याचबरोबर स्मारक चौक ते कालिका माता मंदिर *डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग* व एम. एस.ई.बी. ऑफिस पासून जाणारा नंदुरबार बायपास *क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मार्ग* व भन्साली प्लाझा ते हायवे बायपास *फातिमा शेख* मार्ग असे संबोधण्यात यावे व या संदर्भात तसा ठराव करण्यात यावा अशी विनंती निवेदनाद्वारे नगराध्यक्ष त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आली आहे.
0 Response to "तळोदा शहरातील रस्त्यांना विविध महापुरुषांची नावे देण्यात यावीत.- मागणी"
टिप्पणी पोस्ट करा