भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनी तळोद्यातील हुतात्मा स्मारक व स्वातंत्र्यसैनिकांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पडला विसर ❗
तळोदा - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनी तळोद्यातील हुतात्मा स्मारक व स्वातंत्र्यसैनिकांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून आले आहे.
शहरात शासनाकडून तळोदा तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी कारावास भोगला व आपले जीवन स्वातंत्र्या साठी अर्पण केले अश्या ११ स्वतंत्रता सेनानी यांच्या स्मरणार्थ व शहिदांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक मुख्य बाजारपेठेत व प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात उभारण्यात आले आहे या स्मरकावरील शिलालेखावर तळोदा तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामात कठोर कारावास भोगणाऱ्या ११ स्वातंत्र्य सैनिकांचे समरणार्थ त्यांची नांवे कोरण्यात आली आहेत परंतु आज सर्वत्र स्वातंत्र्याचा ७५ वर्ष पूर्ती निमित्त सर्वत्र अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असतांना या ठिकाणी प्रशासनाकडून नगरपालिके कडून किंवा लोकप्रतिनिधी कडून आज कोणी साधे अभिवादन सुद्धा केले नाही एवढेच काय तर कोणी साधे एक फुल सुद्धा अर्पण केले नाही त्याच स्मारकवरून सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनातील मोठे अधिकारी तहसील कार्यालयात प्रशासकीय इमारतीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास गेले परंतु कोणालाच या हुतात्मा स्मारका च्या ठिकाणी २ मिनिट उभे राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले कारावास भोगला त्या शहिद आणि तळोदा येथील स्वातंत्र्यसैनिकांचा स्मृतीला वंदन करून अभिवादन करण्याचे सुचले नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी हे हुतात्मा स्मारक व तळोद्यातील स्वातंत्र्य संग्रामात आपला संसार पणाला लावून इंग्रजांशी झुंजनारे ११ स्वातंत्र्यसैनिक
मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून उपेक्षितच राहिले..
प्रतिक्रिया-
तळोदा पालिकेने ४ दिवसांपूर्वीच हुतात्मा स्मारकाची रंग रंगोटी केली परंतु पालिका प्रशासना व पालिकेच्या लोक प्रतिनिधी किंवा याच स्मारकावरून प्रशासकीय इमारतीत जाणाऱ्या सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी हुतात्म्यांना व स्वतंत्रता सेनानी यांना साधे अभिवादन करून पुष्पसुद्धा अर्पण केले नाही सगळ्यांनाच स्वतंत्रता सेनानींचा आजच्या दिवशी विसर पडला याचे दुःख वाटते.
उल्हास मगरे
स्वातंत्र्यसैनिक भगवान गोविंद शेंडे यांचे वंशज (नातू)
0 Response to "भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनी तळोद्यातील हुतात्मा स्मारक व स्वातंत्र्यसैनिकांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पडला विसर ❗"
टिप्पणी पोस्ट करा