संपर्क करा

तळोदा तालुक्यातील देवमाणूस हरपला : डॉ.वासुदेव मगरे अनंतात विलीन

तळोदा तालुक्यातील देवमाणूस हरपला : डॉ.वासुदेव मगरे अनंतात विलीन

तळोदा - शहरास तालुक्यात सर्वांना परिचित असलेले ग्रामीण भागासह गौर गरिबांमध्ये गरिबांचे डॉक्टर म्हणून नावलौकिक असलेले डॉ. वासुदेव मगरे यांचे सोमवारी दुपारी 4:00 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी 1 मुलगा, सून, 2 मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तळोद्यातील देवदूत हरपल्याची भावना व्यक्त होत असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय त्यांच्या जाण्याने माफक दरात व विना रिपोर्ट उपचार घेण्याची परंपरा खंडीत होणार असल्याचे बोलले जात आहे.

          डॉ.वासुदेव मगरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुण्याचा टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातुन बी.ए.एम. एसचे शिक्षण घेतले. त सुरुवातीला खापर येथे रुग्णालय सुरू केले. तालुक्यातील सर्वसामान्य गौर गरीब आदिवासी जनतेला अल्प दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने त्यांनी खापर नंतर तळोदा येथे रुग्णालय सुरू केले. आपल्या व्यवसायात केवळ वैद्यकीय सेवा देण्याचं काम त्यांनी केलं. पंचक्रोशीत गरिबांचा डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. अगदी 10-20 रुपयांत त्यांनी मरे पावेतो रुग्णसेवा केली. तळोदा परिसरातील सर्व गावात सुमारे ४० ते ४५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले, रुग्णांशी जिवाभावाचे संबध ठेवत आलेल्या रुग्णाशी ते विनोदाने बोलून चिमटा घेत व त्यांना हसविण्याचा प्रयत्न करत, दवाखान्यात कोणीही आरोग्यसेवक नसल्यामुळे अपेक्षित तेवढी स्वच्छता त्यांच्या दवाखान्यात नव्हती, बडेजावा पणा नसल्याने सामान इतरत्र पसरलेला असायचा त्यामुळे बाहेर गावातून अथवा पर राज्यातून येणाऱ्या रुग्णानी बऱ्याच वेळा डॉक्टर कुठे आहेत अशी विचारणा त्यांनाच केली जात होती. डॉक्टर यावर कधीही चिडले नाही याउलट डॉक्टर लवकरच येथील असे म्हणून त्यांना बसवून ठेवत स्थानिक रुग्ण आले की त्याना औषदोपचार करत असताना हेच डॉक्टर असल्याचे कळल्यावर त्यांना देखील वेगळाच धक्का बसायचा व डॉक्टर हसून त्यांना मीच डॉक्टर असल्याचे सांगत त्यावेळी अक्षरशः हस्यां पिकत, त्यानंतर त्यांची विचारपूस करून ते औषधोपचार करत असे व रुग्णांना एवढ्या कालावधीत तू बरा होशील असे सांगत असे रडत आलेला रुग्ण हसत जात असे.. 

             पैशापेक्षा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी काम केलं. म्हणूनच येथील ग्रामस्थांनी देवमाणूस असा उल्लेख त्यांचा केला. त्यामुळेच, त्यांच्या निधनाने गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली तर अनेकांनी त्यांच्या आठवणी जागवत, असा डॉक्टर होणे नाही, असे म्हणत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. डॉ.मगरे गेल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या जाण्याने माफक दरात व विना रिपोर्ट उपचार घेण्याची परंपरा खंडीत होणार हे निश्चित आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

*छोट्याशा कागदावरील प्रिस्क्रिप्शन*

           डॉक्टर मगरे यांनी प्रिस्क्रिप्शन लेटर कधीही तयार केले नाही, कागदाची बचत करतोय असे म्हणत त्यांनी अगदी कागदाच्या छोट्याश्या तुकड्यावर ते औषधी लिहून देत, पंचक्रोशी कुठेही त्यांनी लिहून दिलेले कागद पाहून मगरे डॉक्टर यांनी लिहलेले  औषधें असल्याचे त्यांच्या लक्षात येई, एवढेच नव्हे तर  राज्यातील बड्या रुग्णालयात देखील त्यांची चिठी ओळखली जात होती. सदरचे प्रिस्क्रिप्शन पाहून तेथील डॉक्टरांनी देखील हे मगरे डॉक्टरांचे रुग्ण असल्याचे सांगूंन औषध अगदी बरोबर असल्याचे सांगुण हेच औषदे पुढे सुरू ठेवा असे सांगत असल्याचे उदाहरण रुग्ण सांगतात. अगदी शेवटच्या क्षणा पावेतो त्यांनी रुग्णांना सेवा दिली. डॉक्टराची प्राण ज्योत मावळल्याचे कळताच उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. डॉक्टर मेल्यानंतर रुग्ण रडतील असे उदाहरण नक्कीच दुर्मिळ असू शकते. 


*कोरोना काळात रुग्णांना सेवा*
            कोरोना काळ हा सर्वांसाठी आव्हानात्मक काळ होता. सुरुवातीच्या काळात सर्दी-ताप असणाऱ्या रुग्णांला देखिल डॉक्टर तपासायला धजावत नव्हते. कोरोनाचा सुरुवातीच्या काळात रुग्णांना बिनधास्तपणे व आपुलकीने डॉ मगरे यांनी उपचार दिले. त्यातील अनेक रुग्ण नंतर कोरोना पॉसिटीव्ह देखिल निघाले मात्र एखादा रुग्ण कोरोना सदृश आहे म्हणून त्यांनी रुग्णांना कधीही सापत्न वागणूक दिली नाही. कोरोना काळातही सर्वसामान्य रुग्णांना हक्काचा व विश्वासाचा डॉक्टर म्हणून डॉ. मगरे हेच नांव तळागाळातील रुगांच्या ओठावर होते. 

             माणसाने जीवन जगतांना किती पैसे कमावले किंवा किती संपत्ती कमावली याला महत्त्व नसते तर त्याने किती माणसे कमावली याला महत्त्व असते.डॉ मगरे यांनी वैद्यकीय सेवा देत असतांना माणसे कमवली. रुग्णांच्या हृदयात घर त्यांनी घर केले.'मरावे परी किर्तीरूपी उरावे' ही उक्ती डॉ मगरे यांच्या जीवनपटाला सार्थ ठरते. आज जरी डॉ मगरे देहाने नसतील तरी डॉ मगरे यांचे वैद्यकीय सेवेतील कार्य व योगदान अजरामर राहील हे मात्र नक्की.....

*नाळी परीक्षणात तज्ञ*

     डॉ.मगरे यांनी कधी स्टेटसकोपच्या सहाय्याने रुग्णांचे निदान केलेले आठवत नाही, त्यांचा प्रदीर्घ अनुभव व अभ्यासाच्या जोरावर रुग्णांचे नाळी परीक्षण करून ते अचूक निदान करत होते. शयन अवस्थेत असलेल्या रुग्णांना देखील त्यांनी बरे केले आहे. डॉ.मगरे यांच्या उपचारामुळे अनेकांना बोनस आयुष्य जगता आले असल्याचे म्हणणे आहे. याशिवाय मरण अवस्थेत आलेले रुग्णांकडून पैसे लाटण्यापेक्षा त्यांना कुठेही घेऊन जाऊ नका घरीच सेवा करा, याशिवाय केस काढण्याची तयारी करा असे विनिदाने ते सांगत....

0 Response to "तळोदा तालुक्यातील देवमाणूस हरपला : डॉ.वासुदेव मगरे अनंतात विलीन"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article