नगराध्यक्षासह काही नगरसेवक माझ्या संपर्कात रा.काँ.प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी
तळोदा : नगरपरिषदेत मी निवडून दिलेले नगराध्यक्ष व नगरसेवकाना माझ्या शिवाय पर्याय नसून भाजपाचे ते सर्वच नगरसेवकांसह नगराध्यक्ष माझ्या संपर्कात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी तयारी करण्याचे सूचित केले असून उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले आहे. यासह नगरपालिकेसाठी विशेष निधी म्हणून 5 ते 10 कोटी किंवा याहीपेक्षा जास्त निधी मागाल तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांच्याकडून मिळाले आहे. विरोधी पक्षाने निवडणुकीच्यावेळी कितीही आवाहने दिली तरी त्यांना घरच्या रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी रा.काँचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केले.
आदिवासी सांस्कृतिक भवन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळोदा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व पक्षांची शहर कार्यकारणीचा पद वाटप सोहळा प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार उदेसिंग पाडवी हे होते. त्यांच्यासह सहकार सेल जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आघाडे, तालुकाध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपूत, नितीन पाडवी, नगरसेविका सौ.अनिता परदेशी, शोभा क्षत्रिय, शहराध्यक्ष योगेश मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनुसूचित जाती प्रदेशचे नरेश पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जाकीर मिया जहागीरदार, ओबीसी सेलचे कमलेश चौधरी, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते निखील तुरखीया, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संचालक कृ.उ.बा. समिती तळोदा भरत चौधरी, नितीन पाडवी, युवा कार्यकर्ते संदीप परदेशी, गणेश पाडवी, भट्या पाडवी, महेंद्र पोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते
उदेसिंग पाडवी पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष सर्वसामान्य लोकांचा व समाजाच्या लोकांना घेवुन चालणार पक्ष आहे. पक्षाने आदेश दिला तर आघाडी करून नगरपरिषदेवर झेंडा फडकवणार कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर लढण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी राष्ट्रवादीच्याच झेंडा फडकेलं असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. संपर्कात असलेले नगरसेवक यांच्या माझ्यावर विश्वास आहे, आगामी विधान परिषदेची निवडणूक होऊनन जाऊ द्या आम्ही तुमच्या पक्षात प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही, नगराध्यक्षाला सुद्धा माझ्या शिवाय पर्याय नाही त्यांना माझ्यासोबत द्यावे लागेलच आणि नाही आले तर मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती झाली होती ती मी यावेळीही केल्याशिवाय राहणार नाही आगामी विधान परिषदेच्या निवडणुका संपल्यावर माहे फेब्रुवारी मार्च मध्ये संपर्कात असलेले सर्वच प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेळाव्यात जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय, डॉ.जगदीश मराठे, डॉ.लक्ष्मीकांत गिरणार, संदीप परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले. प्रस्तावना शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलेश पाडवी, आदिल शेख, धर्मराज पवार, मुकेश पाडवी, जयेश जोहरी, महेंद्र पोटे, अरविंद वळवी, संदीप पाडवी, सुनील पाडवी, कुणाल शिरसाठ, रवींद्र पाडवी, जावीद पिंजारी, इमरान सिकलीकर, नदीम बागवान, आकाश पाडवी, पप्पू पिंजारी, प्रकाश पाडवी, सागर खैरनार संजय वानखेडे, विकास खाटीक आदींजन सहभागी झाले होते....
*अशी आहे शहराची कार्यकारणी*
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या तळोदा शहर अध्यक्षपदी योगेश शांताराम मराठे, उपाध्यक्षपदी गणेश पाडवी, अनील पवार, गणेश राणे, योगेश पाडवी, नदीम बागवान, सरचिटणीस महेंद्र पोटे, चिटणीस रवींद्र गाढे, राजेश धानका, नितीन वाघ, खजिनदार संघटक धर्मराज पवार, राहुल पाडवी, सहसंघटक मुकेश पाडवी, शेख नासिर शेख हरून, सदस्य- किरण पाडवी, गणेश शिवदे ,संजय वानखेडे, आयुब पिंजारी ,मच्छिंद्र पाडवी ,श्रीकांत बागुल, जितेंद्र केदार ,रवींद्र पाडवी, योगेश चौधरी, रामा पाडवी, महेश जगदाळे, अनिल भारती, फराज पठाण, अरविंद वळवी समावेश आहे.
0 Response to "नगराध्यक्षासह काही नगरसेवक माझ्या संपर्कात रा.काँ.प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी "
टिप्पणी पोस्ट करा