संपर्क करा

कै.डॉ.राजेंद्र मराठे यांच्या स्मृती पित्यर्थ नागरिकांना सुरक्षा विमा

कै.डॉ.राजेंद्र मराठे यांच्या स्मृती पित्यर्थ नागरिकांना सुरक्षा विमा

तळोदा : तळोदा येथील स्व. डॉक्टर राजेंद्र शंकरराव मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा विमा मोफत काढून देण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या मोफत विमाचा लाभ घेतला. 

              आज गुरुवारी रोजी स्वामी सरस्वती बहुउद्देशीय संस्था व भोई समाज नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमनाने हा कार्यक्रम भोई गल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

           कार्यक्रमाला बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक विशाल जाधव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विमा हा आपल्या पश्चात आपल्या परिवाराला आर्थिक पाठबळ देण्यासाठी उपयुक्त आहे, विमा असल्यास कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा कवच मिळते. असे सांगून त्यांनी विमाचे महत्व उपस्थिताना पटवून दिले.  

             संदीप पवार यांनी डिजिटल साक्षरता व सोशल सिक्युरिटी संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित बांधवाणांचा मोफत विमा या प्रसंगी उतरविण्यात आला. यावेळी स्वामी सरस्वती बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आनंद जगदीश मराठे यांनी स्व डॉ.राजेंद्र मराठे यांच्या किर्तीचा आढावा स्मरण करून दिला. यावेळी भूषण पवार बँक ऑफ  बडोदा तसेच सचिन तावडे भोई समाज उपाध्यक्ष गणेश शिंदे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष जगदीश वानखडे उपाध्यक्ष युवा प्रकाश वानखेडे सर चंद्रकांत साठे  भोई तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोई सर निखिल साठे अण्णा भोई पिंटू भोई सुनील शिंदे आदी उपस्थित होते.....

0 Response to "कै.डॉ.राजेंद्र मराठे यांच्या स्मृती पित्यर्थ नागरिकांना सुरक्षा विमा"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article