संपर्क करा

शहरातील घरकुलांचे प्रकरणे मंजूर करा : प्रभाग 2 च्या नगरसेवकांची मागणी

शहरातील घरकुलांचे प्रकरणे मंजूर करा : प्रभाग 2 च्या नगरसेवकांची मागणी

तळोदा : तळोदा शहरातील नगर परिषद हद्दीतील मागील मंजूर घरकुल प्रकरण व नवीन मंजूरीसाठी असलेले प्रकरणाबाबत नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी यांच्या वतीने नगराध्यक्ष अजय परदेशी यांना निवेदन देण्यात आले. 

      या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरातील नगर परिषद हद्दीतील काही नागरिकांची मागील काळात घरकुल प्रकरणे ही मंजूर झाली होती. परंतु त्यांना आजवर त्यांचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही. तसेच नव्याने १८५ प्रकरणे ही नगर परिषदेत सर्व कागदपत्रांसह नागरिकांनी मंजुरीसाठी जमा केली आहेत. परंतु त्यांची ही नव्याने जमा केलेली प्रकरणे अजूनही मंजूर झालेले नाहीत. मागील काळातील मंजूर प्रकरणातील नागरिकांची आर्थिक अडचण या प्रकारामुळे होत आहे. व नव्या मंजूरीसाठी जमा केलेले नागरिकांची प्रकरण मंजूर न झाल्याने त्यांचा निवारा या भूलभत गरजेची दैनंदिन अडचण भासत आहे. अशी व्यथा काही लाभार्थ्यांनी आमच्याकडे मांडली आहे...

       तरी आपणास विनंती आहे की, आपण लवकरात लवकर मागील काळातील मंजूर १०० प्रकरणातील शेवटचा हप्ता व नविन १८५ प्रकरण मंजुरीसाठी कागदपत्र जमा केलेल्या नागरिकांची अडचण ही लवकरात लवकर सोडवून त्या नागरिकांना सहकार्य करावे. तसेच सदर प्रकरणात दिरंगाई झाल्यास पुढील काळात या प्रकरणी तळोदा शहरात सदर नागरिकांना सोबत घेऊन जन आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्व जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील असे निवेदन नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका अनिता परदेशी यांच्या वतीने नगराध्यक्ष अजय परदेशी यांना निवेदन देण्यात आले.

0 Response to "शहरातील घरकुलांचे प्रकरणे मंजूर करा : प्रभाग 2 च्या नगरसेवकांची मागणी"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article