माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुपोषित बालकांना व स्तनदा माताना आम.पाडवीच्या हस्ते फळे वाटप
तळोदा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम.राजेश पाडवी यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन रुग्णाच्या प्रकृतीबाबत विचारपूस करून त्यांना फळ वाटप केले.
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाची समस्यां ही गंभीर आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना कालावधीत या कुपोषित बालकांच्या आकडेवारीत वाढ झाले असून चिंता वाढली आहे. याबाबत संबधीत डॉक्टर्स व तज्ञांना विचारपूस करून नियोजन करण्यासाठी व कोपोषित बालकांच्या भेटीगाठीसाठी आम.राजेश पाडवी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन स्तनदा माता व शिशु यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस करून त्यांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष भाग्याश्री चौधरी, चिटणीस हेमलाल मगरे, राजेश राजपूत, तळोदा तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण ठाकरे,विलास डामरे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिरीष माळी, विठलं बागले, प्रवीण वळवी, मंगेश पाटिल, रसिलाबेन देसाई, अमी तुरखीया, शोभना देसाई भारती कलाल, लिंआबेन मेहता डॉ महेंद्र चव्हाण किरण मगरे वैद्यकीय अधिकारी डॉ हापसिंग पाडवी आदी उपस्थित होते...
0 Response to "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुपोषित बालकांना व स्तनदा माताना आम.पाडवीच्या हस्ते फळे वाटप"
टिप्पणी पोस्ट करा