राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
तळोदा : तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित कोरोना योद्धाना कपडे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम माजी आम. तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी व जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी संस्कृती भवन येथे दुपारी 2 वाजता करण्यात आले होते. याहा मोगी मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आम उदेसिंग पाडवी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे हे होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सौ.अश्विनी जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जाकीर मिया जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहादा तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर , नंदुरबार विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य भरत चौधरी, प्रल्हाद फोके, राजेश पाटील, केसरसिंह क्षत्रिय, तळोदा नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सौ.अनिता परदेशी, संदीप परदेशी, योगेश मराठे, पूनम मराठे, लक्ष्मीकांत गिरणार, महेंद्र पोटे आदी उपस्थित होते. आपल्या लाडक्या नेत्यांचा वाढदिवस केक कापून साजरी करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश मराठे यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाराष्टाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तळोदा शहर राष्ट्रवादी पक्षाचे गणेश पाडवी, संजय वानखेडे, आदिल शेख, विकास क्षत्रिय, गणेश पाडवी, इम्रान शिकलीकर, प्रकाश पाडवी, धर्मा पवार, जयेश जोहरी, नदीम बागवान, संदीप पाडवी, मुकेश पाडवी, गणेश पाडवी, बंटी सूर्यवंशी, मणियार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.....
0 Response to "राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन"
टिप्पणी पोस्ट करा