संपर्क करा

अंतर्गत कलहामुळे लवकरच महाविकास आघाडी सरकार कोसळेल : वासुदेव काळे भाजपा किसान मोर्चाचे महा.प्रदेश अध्यक्ष

अंतर्गत कलहामुळे लवकरच महाविकास आघाडी सरकार कोसळेल : वासुदेव काळे भाजपा किसान मोर्चाचे महा.प्रदेश अध्यक्ष


तळोदा : आदिवासी पट्यातील सर्व सामान्य जनतेला केंद्राच्या राज्याचा योजना पोहचविण्यासाठी किसान मोर्चा कटिबद्ध असेल. राज्यातील महाविकास आघाडीचे सहकार निद्रिस्त आहे. राजकारणात सत्ताधारी पक्ष हे केवळ शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत. याशिवाय अंतर्गत कलहामुळें महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल व राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार अस्तित्वात येईल. व राज्यात विकासाची गंगा वाहिल असे मत भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेव शंकर काळे यांनी व्यक्त केले.

        भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेव शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान उत्तर महाराष्ट्र विभाग अंतर्गत तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यां जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणेसाठी व शेतकरी संघटन वाढीसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते.
 
            या मेळाव्यास नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा किसन मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोईर, प्रदेश संघटन सरचिटणीस  मकरंद कोरडे, माजी तालुकाध्यक्ष श्यामसिंग राजपूत, भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, प.स सदस्य विजय राणा, प.स सदस्य विक्रम पाडवी, प.स सदस्य दाज्या पावरा, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंग राजपूत, राणीपुर ग्रा.सदस्य प्रकाश वळवी,शहर अध्यक्ष भाजप किसान मोर्चा संजय कर्णकार आदींजन व्यासपीठावर उपस्थित होते. 

                याप्रसंगी वासुदेव काळे बोलताना म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. ऊस उत्पादन करणारा शेतकऱ्यांची कारखानदार पिळवणूक करतात. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने बँका, सोसायतटया कारखाने घेऊन हुकमशाही सुरू केली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सातपुडा साखर कारखाना व इतर करखान्याचे पेमेंट झाले नसल्याचे सांगून सदर रक्कम काढण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील पालकमंत्र्यानी मौन धारण केले असून कुचकामी नेतृत्व असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री पदाने घेतलेले निर्णयामुळे शेतकऱ्यांचा लाभ झाला आहे. 
देशातला शेतकरी सुजलाम सुफलाम् करण्यासाठी भाजपा किसान मोर्चा कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत शेती संबधीत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
      
                 भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोईर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळणेसाठी त्यावर संशोधन करण्यासाठी भाजपा सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. भाजप सरकारने पी.एम.व्हाय सबसिडी उपलब्ध करून दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रवीण राजपूत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले. आभार प.स सदस्य विजय राणा यांनी मानले..

चौकट
             भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी चिटणीस पदी माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत यांची निवड करण्यात आली. भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेव शंकर काळे यांच्या हस्ते निवड पत्र देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला. त्यांच्या अनुभवाचा लाभ शेतकरी हितासाठी व संघटनात्मक वाढीसाठी व्हावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.


0 Response to "अंतर्गत कलहामुळे लवकरच महाविकास आघाडी सरकार कोसळेल : वासुदेव काळे भाजपा किसान मोर्चाचे महा.प्रदेश अध्यक्ष "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article