संपर्क करा

तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शितल पाडवी यांची निवड स्वीकृत नगरसेवकपदी हितेंद्र क्षत्रिय व गिरीधर सागर

तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शितल पाडवी यांची निवड स्वीकृत नगरसेवकपदी हितेंद्र क्षत्रिय व गिरीधर सागर

तळोदा : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या शितल पाडवी (पटेल) यांची निवड झाली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून गिरधर रामचंद्र सागर यांची शिवसेनेकडून हितेंद्र क्षत्रिय यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना कडून देखील उमेदवारी दाखल करण्यात आली होती.
             नगरपालिका निवडणुकीनंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा पालिकेच्या सभागृहात पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी हे होते.तर उपनगरध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निर्णय अधिकारी म्हणून म्हणून मुख्याधिकारी विक्रम जगदाळे उपस्थित होते.
    उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेच्या युतीकडून नगरसेवक कपिल कर्णकार व नगरसेविका मोनिका सुरज माळी या दोघांचे नामांकन दाखल करण्यात आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शितल पाडवी (पटेल )यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. माघारीच्या मुदतीत शिवसेनेचे कपिल कर्णकार यांनी माघार घेतली. त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवून उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. यात राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल पाडवी यांना ११ मते मिळाली तर भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार मोनिका सुरज माळी यांना १० मते मिळाली. त्यामुळे शितल पाडवी यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम जगदाळे यांनी केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पालिकेच्या आवारात फटाक्यांचे आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.
     त्यानंतर नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी स्वीकृत नगरसेवक पदांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नामनिर्देशित करण्यात आलेल्या उमेदवारांची घोषणा केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गिरधर रामचंद्र सागर यांची तर भाजपा युतीकडून हितेंद्र क्षत्रिय यांची निवड जाहीर केली.
      बैठकीला भाजपा ज्येष्ठ नगरसेवक तथा गटनेते अजय परदेशीं, प्रतोद शिरीष माळी,रत्ना चौधरी,जयश्री महाले,शिवसेनाचे गटनेता अनुप उदासी, प्रतोद प्रतीक्षा दुबे, अनिता परदेशीं, कपिल कर्णकार, मोनिका माळी, नदीम बागवान,राष्ट्रवादीचे गटनेता कल्पेश चौधरी,शितल पाडवी,रामानंद ठाकरे,इम्रान खाटीक,लक्ष्मी नाईक,गायत्री पिंपरे,हर्षाबाई पाडवी,मीराबाई कोळी,अरविंद प्रधान,
आदी नगरसेवक उपस्थित होते.
        दरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या भाजप,शिवसेना युतीच्या नगरसेवकांकडून सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपनगराध्यक्ष शितल पाडवी स्वीकृत नगरसेवक गिरधर सागर, हितेंद्र क्षत्रिय यांचा देखील दोन्ही गटांकडून सत्कार करण्यात आला. सभेत शिवसेनेचे गटनेते अनुप उदासी यांनी शहर विकासाच्या कामांसाठी विरोधी पक्षाकडून पूर्ण सहकार्य मिळेल त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाला देखील विकास कामांसाठी सहकार्य मिळण्याचे अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी नगरपालिकेत विरोधकांसाठी स्वतंत्र दालनाची मागणी देखील नगराध्यक्षांकडे सभेत केली.उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मित्र पक्ष भाजपच्या सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.
        बैठकीच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम जगदाळे, कार्यालय अधिक्षक कमलेश काळे, बांधकाम उप अभियंता सनी ठाकरे,नितीन शिरसाठ, लेखापाल लखन कंड्रे,अजय वाघ,नितेश अहिरे यांनी परिश्रम घेतले.

0 Response to "तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शितल पाडवी यांची निवड स्वीकृत नगरसेवकपदी हितेंद्र क्षत्रिय व गिरीधर सागर"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article