प्रगतशील शेतकरी राजेंद्र पंजराळे यांच्या शेतात आढळला घोणस जातीचा विषारी साप. सर्पमित्र दिनेश कोळी यांनी दिले जीवदान
तळोदा : प्रगतशील शेतकरी राजेंद्र पंजराळे यांचा शेतीत काम सुरू असताना शेतमजुरांना घोणस जातीचा विषारी साप आढळला. साप पाहताच भीतीने कामगार घाबरले, परंतु पंजराळे यांनी धीराने परिस्थिती हाताळली आणि तात्काळ सर्पमित्राला बोलावले.
सर्पमित्र दिनेश कोळी याने त्वरित घटनास्थळी येऊन सर्वप्रथम उपस्थितांना सापाशी सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला. आवश्यक उपकरणांसह त्याने घोणस सापाला पकडण्यास सुरुवात केली. साप पानांच्या ढिगाऱ्यात लपलेला असल्याने त्याला शोधण्यात काहीसा वेळ गेला, परंतु सर्पमित्राच्या कौशल्यामुळे तो सुरक्षितरीत्या पकडला गेला.
सर्पमित्राने साप पकडल्यावर शेतकऱ्यांसमोर सापाची माहिती दिली. घोणस हा अत्यंत विषारी साप असून, तो उगाच कोणावरही हल्ला करत नाही, हे समजावले. शेतकऱ्यांनी सापांविषयी जागरूक राहावे, आणि कोणत्याही प्रकारच्या सर्पदर्शनावेळी तात्काळ सर्पमित्राची मदत घ्यावी, असे सांगितले.
सर्पमित्राने घोणस सापाला कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. पंजराळे यांनीही या प्रकाराचे कौतुक केले.
0 Response to "प्रगतशील शेतकरी राजेंद्र पंजराळे यांच्या शेतात आढळला घोणस जातीचा विषारी साप. सर्पमित्र दिनेश कोळी यांनी दिले जीवदान "
टिप्पणी पोस्ट करा