भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी बजावला मतदानाचा हक्क
नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा-शहादा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार आणि उमेदवार राजेश पाडवी यांनी आज सकाळी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची कन्या नेहा पाडवीही उपस्थित होती.
नेहा पाडवी यांनी लोकशाही प्रक्रियेचे महत्व अधोरेखित करत मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुण मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला.
मतदानानंतर बोलताना राजेश पाडवी म्हणाले, "लोकशाहीला बळकट करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या मताचा योग्य वापर करावा आणि देशाच्या विकासात सहभागी व्हावे."
यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळोदा-शहादा मतदारसंघात शांततामय वातावरणात मतदान सुरू असून, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
0 Response to "भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी बजावला मतदानाचा हक्क"
टिप्पणी पोस्ट करा