संपर्क करा

मध्यरात्रीच्या चोरीने सहा घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

मध्यरात्रीच्या चोरीने सहा घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

शहादा : तालुक्यातील वैजाली येथे २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पाच ते सहा घरे फोडून सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची गंभीर घटना घडली. चोरट्यांनी बंद घरे निवडून त्यांच्या दरवाजांचे कडी-कोयंडे तोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरी झालेल्या घरांमध्ये नगूबाई सुदाम पाटील, श्रीराम पाटील यांचे भाडेकरू गिरासे, अनिल विश्वास पाटील, आणि ज्ञानेश्वर मक्कन पाटील यांचा समावेश आहे.

चोरट्यांनी कपाटे व लोखंडी पेट्या तोडून ऐवज लुटला.

काही घरांमध्ये फक्त अस्ताव्यस्त स्थिती आढळली; 

           घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजन मोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी भेट दिली.

नंदुरबारहून श्वानपथक व ठसे तज्ञ पाचारण करण्यात आले. ठसे गोळा करून तपासाची प्रक्रिया सुरू आहे. पो.नि. राजन मोरे यांनी ग्रामस्थांना घर बंद ठेवताना खबरदारी घेण्याचे, शेजाऱ्यांना माहिती देण्याचे, व घराबाहेर दिवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या पोलिसांनी तपास गतीने सुरू केला असून चोरट्यांना लवकरच पकडले जाईल, अशी अपेक्षा आहे.

0 Response to "मध्यरात्रीच्या चोरीने सहा घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article