आमदार पाडवींच्या ऐतिहासिक विजयानंतर तळोद्यात शुभेच्छा समारंभ
तळोदा : आमदार पाडवी यांच्या ऐतिहासिक विजयानंतर तळोद्यातील बिरसामुंडा चौकातील त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी कार्यकर्ते, आशा वर्कर्स, समर्थक आणि विविध भागांतील नागरिकांनी गर्दी केली होती.
कार्यकर्त्यांनी फुलांचे हार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आमदार पाडवींचा सत्कार केला. याप्रसंगी युवक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या वेळी आमदार पाडवी भावुक होत “हा विजय माझा नसून जनतेचा आहे. तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास माझे ध्येय आहे.” त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी, महिलां ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या विजय सोहळ्यामुळे मतदारसंघात आनंदाचे आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी प्रा.विलास डामरे, जितेंद्र सुर्यवंशी, गौरव वाणी, कैलास चौधरी, प्रकाश वळवी, बळीराम पाडवी, भरत पवार, जगदीश परदेशी, नारायण ठाकरे, गुड्डू वळवी, किरण सुर्यवंशी,चेतन शर्मा, यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामस्थ व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "आमदार पाडवींच्या ऐतिहासिक विजयानंतर तळोद्यात शुभेच्छा समारंभ"
टिप्पणी पोस्ट करा