संपर्क करा

लोखंडी हुकने पिता-पुत्रास मारहाण: नंदुरबारमध्ये किरकोळ वादातून हिंसाचार"

लोखंडी हुकने पिता-पुत्रास मारहाण: नंदुरबारमध्ये किरकोळ वादातून हिंसाचार"


लोखंडी हुकने पिता-पुत्रावर वार: नंदुरबारातील घटना
नंदुरबार - किरकोळ कारणावरून झालेल्या वादात लोखंडी हुकने डोक्यावर वार करीत पिता-पुत्रास जखमी केल्याची घटना समोर आली आहे. समता कॉलनीतील सुकलाल जयराम जिरेमाळी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेला 'तुम्ही घरात का येवू देता?' असे बोलून वाद निर्माण केला. या कारणावरून महेश पांडूरंग माळी, भाग्यश्री महेश माळी आणि गीता बिरबल वळवी यांनी सुकलाल जिरेमाळी व त्यांच्या पत्नी सुरेखा यांना मारहाण केली.

त्याचवेळी महेश माळीने लोखंडी हुकने सुकलाल जिरेमाळी आणि त्यांचा मुलगा योगेश जिरेमाळी यांना डोक्यावर वार केले. यामध्ये पिता-पुत्र जखमी झाले. सुकलाल जिरेमाळी यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून महेश माळी, भाग्यश्री माळी आणि गीता वळवी यांच्याविरुद्ध भा. द. वि. सं. कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक इसमल पावरा करत आहेत.

0 Response to "लोखंडी हुकने पिता-पुत्रास मारहाण: नंदुरबारमध्ये किरकोळ वादातून हिंसाचार""

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article