गुलाबी थंडीत वाढल्या शेकोट्या, विविध विषयांवर रांगताहेत चर्चा
तळोदा : हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत गारठा वाढत असल्याने गावोगावी शेकोट्यांना उधाण आले आहे. शेकोटीभोवती बसून गप्पांचे फड रंगवणाऱ्या लोकांचा उत्साह मात्र अधिकच तापला आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, आणि ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचा शेकोट्यांभोवतीचा गोतावळा वाढला आहे.
ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून थंडीला हरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, दिवसभर कामाने थकलेले लोक शेकोटीच्या उबेत गप्पा मारत दिवस संपवतात. शेकोटीभोवती चर्चा रंगतात त्या निवडणुका, शेतीची आव्हाने, बाजारातील दर, हवामानाचा बदल, आणि तरुणांच्या करिअरच्या संधी यांवर. कधी चहा-कॉफीचा कप हातात घेऊन राजकारणावर वादविवाद रंगत आहेत, तर कधी जुने किस्से सांगत हास्याचे फवारे उडताना दिसत आहेत.
थंडीला हरवण्यासाठी जुनी पद्धत कायम हिट तंत्रज्ञानाच्या जमान्यातही थंडीला हरवण्यासाठी शेकोट्या ही एक आवडती आणि परिणामकारक पद्धत आहे. त्यामुळेच, गुलाबी थंडीत शेकोट्यांचा गारवा अनुभवण्याची ही परंपरा आजही टिकून आहे.
0 Response to "गुलाबी थंडीत वाढल्या शेकोट्या, विविध विषयांवर रांगताहेत चर्चा "
टिप्पणी पोस्ट करा