बस अपघात चालकावर प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बस मध्ये होते तब्बल 64 प्रवासी
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तळोद्याहून प्रतापपूर कडे जाणारी बस (क्र.एम एच 20 बी एल 1959) तळोदा धनपूर बस चालकाचे नियंत्रण सुटून पलटी केली या अपघातात शाळकरी विद्यार्थी व वृद्धांना मोठी गंभीर दुखापत झाली आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गाव घेऊन मिळेल त्या वाहनाने जखमींना खाजगी तसेच तळोदा येथील उपजिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले तर अनेक जणांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखान्यांकडे धाव घेऊन प्राथमिक उपचार करून घेतले त्यामुळे जखमींच्या नेमकी संख्या रात्री उशिरापर्यंत समजू शकत नव्हती.
मंगळवारी दुपार दुपारी या अपघाताप्रकरणी बसमधील प्रवासी वसंत रुपा वसावे (75) रा.सिलिंगपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक कुणाल सुभाष देसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये 40 ते 45 प्रवासी यांना दुखापत झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे.
अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची 57 प्रवाशाची नावे पोलिसांनी नोंदवली होती तर त्याच सोमवारी आणखी सात जणांची वाढ झाली. आणखीन या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे करत आहेत.
0 Response to "बस अपघात चालकावर प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बस मध्ये होते तब्बल 64 प्रवासी"
टिप्पणी पोस्ट करा