संपर्क करा

भंवर गावाजवळ भीषण अपघात ! वकिलासह १ जण जागीच ठार, नेमका कसा घडला अपघात?

भंवर गावाजवळ भीषण अपघात ! वकिलासह १ जण जागीच ठार, नेमका कसा घडला अपघात?

तळोदा : येथील वकील संघाचे सदस्य निलेश पारता वसावे व त्यांचे मित्र हांज्या रुपा वसावे हे दोघे मित्र अक्कलकुवा तालुक्यातील चिवलउतार येथून तळोदा येथे परतत असताना भवर गावाजवळ अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर मृत   तरुणांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

         बुधवारी सकाळी ६ वाजे दरम्यान दोघे जन चिवलउतार येथून तळोदाकडे परतत असताना हा अपघात घडला. निलेश पारता वसावे वय ३६ वर्षे रा. चिवलउतार ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ह.मु. विदयानगरी तळोदा,  हांजा रुपा वसावे वय ३४ वर्षे रा.वेली ता. अक्कलकुवा ह.मु. विदयानगरी तळोदा असे तरुणांचे नावे असून दोघे जन मोटार सायकल क्रं.एम.एच.३९.ए.जी. २५५२ वरून येत असताना भवर रस्त्यावर अज्ञात वाहन ठोस देवून फरार झाले, दरम्यान या अपघाताची तीव्रता एवढी होती की, दोघे अपघात ग्रस्तांचा डोक्याला जबर मार लागला यात अक्षरशः दोघांचा मेंदू, कवटी व अन्य अवशेष रस्त्यावर पडून होती. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले मात्र दोघे तरुण जागीच मृत्यू झाले असल्याचे संबंधित डॉक्टरांनी घोषित केले, सदर घटना कुटुंबीयांना कळताच एकच टाहू फोडला. फिर्यादी आसुबाई निलेश वसावे वय ३२ रा. चिवलउतार ता. अक्कलकुवा ह.मु. विद्यानगरी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पो.स्टे येथे फौ.गु.र.नं ४५४/२०२२ भा.दं.वि. क. ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४, १३४, १८७ प्रमाणे अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि पंडितराव सोनवणे हे करीत आहेत....

0 Response to "भंवर गावाजवळ भीषण अपघात ! वकिलासह १ जण जागीच ठार, नेमका कसा घडला अपघात? "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article