तळोदा येथील व्यापार्याचे चारचाकी वाहनातुन पैसे चोरणार्या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या
तळोदा : येथील व्यापार्याचे चारचाकी वाहनातुन १ लाख १० हजार रुपये पैसे चोरणार्या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.५ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तळोदा येथील किराणा मालाचे व्यापारी हुकुमचंद घिसुमल जैन रा. मेनरोड तळोदा हे त्यांच्या चारचाकी वाहनाने तळोदा येथुन खापर व अक्कलकुवा येथुन त्यांन दिलेल्या मालाचे पैसे घेवुन निघाल्यानंतर अक्कलकुवा येथील आमलीबारी फाट्याजवळ पंक्चर दुकानावर जावुन त्याच्याशी बोलत असतांना अज्ञात इसमांनी हुकुमचंद जैन यांच्या गाडीतील रेग्जीनच्या बॅगमध्ये ठेवलेले १ लाख १० हजार रुपये रोख चोरुन नेले म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात हुकुमचंद घिसुमल जैन यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोरोना महामारीमुळे व्यापार्यांची हालाखीची परिस्थीती होती, त्यातच व्यापार्याचे दिवसा १ लाख १० हजा रुपये चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते, त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचेसोबत घडलेल्या घटनेबाब गांभीर्याने चर्चा करुन गुनहा उघडकिस आणुन गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्या बाबत निर्देश दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमक यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन अन्वेषण शाखेचे पथक तयार करुन गुन्हा उघडकिस आणणेबाबत मार्गदर्शन करुन स्वत:ही आपल्या बातमीदारांमार्फत व जेलमधुन सुटुन आलेले व पॅरोल रजेवर आलेल्या मालमत्तेविरुध्दच्या गुन्हेगारांची माहिती काढत होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे सहाय्याने लक्कडकोट येथुन सुनिल खारक्य पाडवी रा. लक्कडकोट ता.तळोदा यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमा कडे विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार रणजित रतिलाल वळवी, युवराज करमसिंग वळवी दोन्ही रा. लक्कडकोट ता. तळोदा , वसंत शेगा पावरा रा. रोझवा पुनर्वसन यांचे मदतीने केली असल्याची हकिगत कळविल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सर्व आरोपीतांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी देखील गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सर्व आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात चोरीस गेले रोख रुपये देखील लवकरात लवकर आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात येतील असे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कळविल आहे.
सदरची कामगि विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (गृह) देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, असई अनिल गोसावी, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक विशाल नागरे, सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक यांचे पथकाने केली आहे.
0 Response to "तळोदा येथील व्यापार्याचे चारचाकी वाहनातुन पैसे चोरणार्या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या"
टिप्पणी पोस्ट करा