
जि. प अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते मालदा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावात आठ हातपंप कामाचे उद्घाटन
तळोदा: तालुक्यातील मालदा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावात जिल्हा परिषद अंतर्गत, कूपनलिका (हॅन्ड पंप) कामाचे भूमिपूजन जि.प. अध्यक्षा अँड सीमाताई वळवी यांचे हस्ते व माजी क्रीडा मंत्री अँड पदमाकर वळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तळोदा तालुक्यातील मालदा ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत मालदा गावात ३, धोजापाणी गावात ४, जुवानी गावात १, असे एकुण ८ कूपनलिका (हात पंप) मंजूर झाले आहे. या कामाचे भुमीपूजन जि.प.अध्यक्षा अँड सीमाताई वळवी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी मंत्री अँड पद्माकर वळवी, मालदा सरपंच करूणा पावरा, पोलिस पाटिल सखाराम ठाकरे, गोपी पावरा, मगन ठाकरे, आंबुलाल वळवी, बेताब पावरा, ग्रा.प. सदस्य गब्बरसिंग पावरा, हरिष खर्डे, सचिन राहसे, बिद्या खर्डे, संजय खर्डे, तिरसिंग पावरा, युवराज वळवी, गौरख पावरा आदि उपस्थीत होते..
Thanks dadasaheb
उत्तर द्याहटवा