
गौसिया मस्जिद येथे आयोजित लसीकरण शिबिरात 93 मुस्लिम बांधवांनी घेतली लस
तळोदा : येथील गौसीया मस्जिद येथे आयोजित लसीकरण शिबिरात 93 मुस्लिम बांधवांनी घेतली लस. लसीकरणाच्या अफवाना बळी न पडता प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन...
आयोजित लसीकरण कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी तळोदा तहसीलदार गिरीश वखारे , प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैधकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, तळोदा नगर पालिकेचे मुख्य अधीकारी सपना वासावा, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे , तळोदा नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, गौसिया मस्जिदचे इमाम हाफिझ खालिद चिस्ती, जामा मस्जिदचे इमाम मोलाना शोएब रझा नुरी, आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार गिरीश वखारे म्हणाले की, लसीकरणाच्या कार्यक्रम घेऊन मुस्लिम समाजाने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. अफवाना बळी ना पळता जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणात भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. तालुका वैधकिय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कोरोनाला हल्ल्यात न घेता, खबरदारी म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करा, सोशल डिस्टन्स, नाका तोंडावर मास्क, सेनेटायझरचा वापर हे त्रिसूत्र सर्वांनी पाळा. लसकीरणाचे प्रमाण वाढले तर तिसऱ्या लाटेवर सहज विजय मिळवता येईल. त्यासाठी सर्वांनी सावध राहा व प्रत्येकाने लसीकरण करून घ्या.
या लसीकरण शिबिरात एकूण 93 जांनानी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमात मुस्लीम समाज अध्यक्ष आरीफ शेख नूरा, नगर सेवक अमानोद्दीन शेख, माझी नगर सेवक कलीम अन्सारी, मतीन शेख, इम्रान अली निसार अली सिद्दीकीया मस्जिदचे सचिव सुलतान अब्दुल गाणी, अक्रम पिंजारी आदि उपस्थित होते.
0 Response to "गौसिया मस्जिद येथे आयोजित लसीकरण शिबिरात 93 मुस्लिम बांधवांनी घेतली लस"
टिप्पणी पोस्ट करा