
तळोदा तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 35 ग्रामपंचायतीना मुदतवाढ मिळणार की प्रशासक बसणार ?
तळोदा: तालुक्यातील ग्रामीण भागातील तब्बल ३५ ग्राम पंचायतीची मुदत पुढील महिन्यात पूर्ण होत असून या ग्राम पंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होते की मुदत वाढ दिली जाते याकडे जनतेचे लक्ष लागून असून सद्या २० ग्राम पंचायतीच्या प्रशासनाच्या कार्यभार केवळ पाच जणांवर असल्यामुळे कामे करताना त्यांनातारेवरची कसरत करावी लागत आहे.
तळोदा तालुक्यात ९१ गावे असून या गावांच्या ६७ ग्राम पंचायती मध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील ३५ ग्राम पंचायतीची मुदत पुढील महिन्यात १८ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे साहजिकच या ग्रामपंचायतींवर राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून प्रशासकाची नेमणूक केली जाते की पुन्हा कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेवून मुदत वाढ दिली जाते याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे. मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायती मध्ये प्रतापापुर, मोड, मोदलपाडा,अमालाड अशा अनेक मोठ्या ग्राम पंचायतींच्या समावेश आहे. या आधीही सध्या २० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहेत. तथापी त्यांच्या कार्यभार केवळ पाच अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. सरासरी एका जनावर 4 पेक्षा अधिक पंचायती सोपविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे एका अधिकाऱ्याकडे तर तब्बल १० पंचायतीच्या भार देण्यात आला आहे. साहजिकच कामे करताना त्यांना किती कसरत करावी लागते याची प्रचिती ग्रामस्थांना येत आहे. वास्तविक प्रशासकाची नियुक्ती करताना जिल्हा परिषद प्रशासनाने सुयोग्य नियोजन करण्याची गरज होती. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक ग्राम पंचायतीने विकासाची कामे हाती घेतली आहे. या कामांवर संबंधितांच्या वचक नसल्याने राम भरोसेच सुरू आहेत. पदाधिकाऱ्यां विना विकास कामांना अप्रत्यक्ष खिळच नसल्याचे ग्रामीण जनतेचे म्हणणे आहे. एक तर ग्राम विकास विभागाने मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायती ना मुदत वाढ द्यावी अशी मागणी होत आहे....
पुढील महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायती
मोड, बोरद, चिनोदा, भवर, बुधावल, आमलाड, छोटा धनपुर, खरवड, मोहिदा, धानोरा, खेडले,करडे, दलेलपूर, काजीपूर, चौगाव बुद्रुक, लाखापूर रे, मोदलपाडा, लोभाणी, मोरवड, नवागाव, न्यूबन, नळगव्हन, पिंपरीपाडा, प्रतापपुर, रोझवे, सलसाडी, शिर्वे, सोमावाल बुद्रुक, सोमावलं खुर्द, तळवे,तुळाजा, वाल्हेरी, झिरी या ग्राम पंचायतींच्या समावेश आहे. यातील बहुसंख्य ग्राम पंचायती या ग्रुप ग्राम पंचायती असल्यामुळे त्या मध्ये अनेक गावांच्या समावेश आहे. तब्बल ३५ ग्राम पंचायतीची मुदत पुढील महिन्या अखेरीस संपत असल्याने प्रशासनास प्रशासकाची नियुक्ती करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आधीच पंचायत समितीच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांच्या रीक्त जागांच्या मोठा अनुशेष आहे....
0 Response to "तळोदा तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 35 ग्रामपंचायतीना मुदतवाढ मिळणार की प्रशासक बसणार ?"
टिप्पणी पोस्ट करा