महाशिवरात्रीनिमित्त श्री दंडपाणेश्वर महादेव मंदिरात भंडारा
नंदुरबार : श्री दंडपाणेश्वर गणपति मंदिर संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अध्यक्ष किशोरभाई कन्हैयालाल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री दंडपाणेश्वर मंदिरात भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
तसेच रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळपासून रात्रीपर्यंत विशेष पूजन, अभिषेक व आरतीचे कार्यक्रम होणार आहेत. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण राहणार असून शिवभक्तांना अध्यात्मिक आनंद अनुभवता येणार आहे. या उत्सवानिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "महाशिवरात्रीनिमित्त श्री दंडपाणेश्वर महादेव मंदिरात भंडारा"
टिप्पणी पोस्ट करा