संपर्क करा

भाजपने तिकीट नाकारताच योगेश चौधरींची राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून धडक उमेदवारी; तळोद्यात राजकीय वातावरण तापले

भाजपने तिकीट नाकारताच योगेश चौधरींची राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून धडक उमेदवारी; तळोद्यात राजकीय वातावरण तापले

तळोदा : शहरात आज मोठी राजकीय उलथापालथ झाली. भारतीय जनता पक्षाने शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या योगेश चौधरी यांनी तत्काळ निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला. या अचानक झालेल्या हालचालीने तळोद्याचे राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षांत चर्चा आणि रणनीतीला वेग आला आहे.
         योगेश चौधरी यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या या निर्णयाने समर्थकांमध्ये उत्सुकता तर प्रतिस्पर्ध्यांमध्ये नव्या गणितांची धांदल उडाली आहे.
          प्रभाग क्रमांक 9 मधील दोन जागा आणि प्रभाग क्रमांक 8 मधील एक जागा वगळता सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली असून शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. योगेश चौधरी यांचा बंडखोरीमुळे राजकीय समीकरणांवर निश्चितच परिणाम होऊ शकतो.
        दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी दाखल केलेले दोन अर्जा पैकी एक उमेदवार अपक्ष आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची लढत अधिकच बहुपक्षीय आणि रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार बदल, पक्षांतर आणि प्रभागनिहाय रणनीती यामुळे तळोद्याची निवडणूक चुरशीची तसेच अनपेक्षित वळणांनी भरलेली ठरणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे....

0 Response to "भाजपने तिकीट नाकारताच योगेश चौधरींची राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून धडक उमेदवारी; तळोद्यात राजकीय वातावरण तापले"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article