शिवसेना शिंदे गटाची भव्य मिरवणूक, हितेंद्र क्षत्रियांसाठी जबरदस्त शक्तीप्रदर्शन
तळोदा : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीनिमित्त शिवसेना शिंदे गटाकडून काढलेल्या मिरवणुकीने शहरात उत्साहाचे वारंवारित वातावरण निर्माण केले. शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांचे नाव पहिलेपासूनच निश्चित असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये जबरदस्त जोश पाहायला मिळाला.
मिरवणुकीची सुरुवात ग्रामदैवत कालिका माता मंदिरापासून करण्यात आली. ढोल-ताशे, डीजे बँड, फटाके आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शिवसेना शिंदे गटाच्या झेंड्यांनी सजलेली मिरवणूक शहरातून पुढे सरकत असताना कार्यकर्त्यांनी सातत्याने घोषणांनी वातावरण रंगतदार केले.
या मिरवणुकीचे आमदार आमदार आमश्या पाडवी माजी जि प उपाध्यक्ष राम रघुवंशी, गणेश पराडके आदींची उपस्थिती दिसताच कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला. आमदारांनी हितेंद्र क्षत्रिय यांच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा व्यक्त केला.
मिरवणुकीच्या माध्यमातून शिंदे गटाने आपले संघटन, कार्यकर्त्यांची ताकद आणि आगामी निवडणुकीतली तयारी स्पष्टपणे दाखवून दिली. या जोशपूर्ण शक्तीप्रदर्शनामुळे शहरात निवडणूक वातावरण अधिक रंगतदार झाले असून शिंदे गटाकडून मजबुत लढतीची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत..
या वेळी आमदार पाडवी यांनी बोलताना सांगितले की तळोदा शहरातील जनतेचा विश्वास आमच्यासोबत आहे. शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे विजय मिळवेल, असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांनीही जनतेचे आभार मानत सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहोत. तळोदा शहराच्या जनतेने आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. मी त्यांच्यातील एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि पुढेही जनतेतच मिसळून राहणार आहे तळोद्याच्या विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत क्षत्रिय यांनी लोकांचा विश्वास कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरात या नामांकनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे...
0 Response to "शिवसेना शिंदे गटाची भव्य मिरवणूक, हितेंद्र क्षत्रियांसाठी जबरदस्त शक्तीप्रदर्शन"
टिप्पणी पोस्ट करा