संपर्क करा

भाजपाची उत्साहवर्धक मिरवणूक; जितेंद्र सूर्यवंशींच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद

भाजपाची उत्साहवर्धक मिरवणूक; जितेंद्र सूर्यवंशींच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद

तळोदा : भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेल्या जितेंद्र सूर्यवंशी यांच्या समर्थनार्थ तळोद्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाजपामध्ये उमेदवार निवडीसाठी झालेली रस्सीखेच शेवटच्या दिवशी संपुष्टात आली आणि सूर्यवंशींच्या नावावर अधिकृत शिक्का मोर्तब करण्यात आला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहताना दिसला.       
     मिरवणुकीची सुरुवात दत्त मंदिरापासून झाली. ढोल-ताशे, डीजे बँड, घोषणाबाजी आणि भगव्या झेंड्यांच्या लाटेमुळे भाजपाचे शक्तीप्रदर्शनही तितकेच भव्य आणि प्रभावी ठरले.
          या मिरवणुकीत विशेषतः आमदार राजेश पाडवी यांची उपस्थिती उत्साहाला उधाण देणारी ठरली. त्यांच्या सोबत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले अजय परदेशी आणि डॉ. शशिकांत वाणी, कैलास चौधरी यांनीही मिरवणुकीत सहभाग नोंदवला. त्यामुळे भाजपमध्ये ऑल वेल असल्याचे स्पष्ट संकेत आमदार राजेश पाडवी यांनी दिले.
            कार्यकर्त्यांनी घोषणांच्या गजरात उमेदवाराचे स्वागत करत मिरवणूक आणखी आकर्षक केली. भाजपाच्या या ऐतिहासिक शक्तीप्रदर्शनामुळे पक्षातील एकजूट आणि आगामी निवडणुकीची तयारी ठळकपणे दिसून आली असून राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
          यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक दोघेही उमेदवारांनी पक्षाची शिस्त पाळत जितेंद्र सूर्यवंशी यांना पाठिंबा दर्शवला आहे..  
             आमदार राजेश पाडवी, डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी आणि शहराध्यक्ष गौरव यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि भरत माळी यांच्या अनुभवातून मिळालेली प्रेरणा अमूल्य आहे. आम्ही सर्वजण एकदिलाने, एकजुटीने पुढील निवडणूक लढवू. तळोदा नगरपरिषदेत सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू..
         ..भाजप अधिकृत उमेदवार...
 जितेंद्र सूर्यवंशी

0 Response to "भाजपाची उत्साहवर्धक मिरवणूक; जितेंद्र सूर्यवंशींच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article