के.आर. पब्लिक स्कूलला ‘जिल्ह्यातील सर्वोत्तम सह-शिक्षण शाळे’चा सन्मान
नंदुरबार – के.आर. पब्लिक स्कूलने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वोत्तम सह-शिक्षण शाळेचा मान पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेने भारतातील सर्वोत्तम सह-शिक्षण शाळा या श्रेणीत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय स्तरावर २८० वा क्रमांक मिळवून नंदुरबारचे नाव उज्ज्वल केले.
या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेचे संस्थाचालक किशोरभाई वाणी आणि सिद्धार्थ वाणी यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन मंडळाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, हे यश संपूर्ण शाळेच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर शाळेने घेतलेले विशेष लक्ष यामागील प्रमुख घटक आहे.
के.आर. पब्लिक स्कूलने शिक्षणासोबतच सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांनाही समान महत्त्व दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा वापर करण्यात येतो.
संस्थेच्या सततच्या प्रगतीमुळे जिल्ह्यातील पालकांचा या शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या बरोबरीने सामाजिक जाणीव निर्माण करणारी ही शाळा जिल्ह्यातील इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शाळेच्या या यशामुळे नंदुरबार जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा पुढेही नव्या उंची गाठेल, असा विश्वास संस्थाचालक वाणी यांनी व्यक्त केला....
0 Response to "के.आर. पब्लिक स्कूलला ‘जिल्ह्यातील सर्वोत्तम सह-शिक्षण शाळे’चा सन्मान"
टिप्पणी पोस्ट करा