तळोदा पी.ई. सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
तळोदा : जिल्ह्यात, विभागातच नव्हे तर राज्यात आपले विशेष स्थान निर्माण केलेल्या तळोदा पी.ई. सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन शेठ. के.डी. हायस्कूलच्या मुख्य शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हीच खरी शाळेची ओळख असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन संस्थेचे सदस्य विश्वनाथ कलाल यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात पुरोहित यांच्या उपस्थितीत शारदा माळी व लक्ष्मण माळी यांनी विधिवत सत्यनारायण पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी होते. व्यासपीठावर कोषध्यक्ष बच्चुसिंग परदेशी, सदस्य तथा माजी नगरसेवक संजय माळी, विश्वनाथ कलाल, सुरेश मगरे, दत्तात्रय माळी, मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी, रोहित माळी व सुशील माळी, आशिष माळी, सुमित माळी, के एस इंगळे,एस बी मोरे,डी बी गिरनार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक अक्कलकुवा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बी.ए. पवार यांनी केले. संस्थेचा वार्षिक अहवाल शेठ. के.डी. हायस्कूलचे पर्यवेक्षक पी.पी. पाटील यांनी सादर केला. अक्कलकुवा शाखेचा अहवाल उपमुख्याध्यापक एम.एन. इंगळे यांनी वाचला, तर बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा अहवाल एच.आर. कलाल यांनी मांडला.
अहवालांतर्गत वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे विश्लेषण, शिष्यवृत्ती प्राप्ती, जिल्हास्तरीय व विभागीय क्रीडा कामगिरी तसेच दहावी-बारावीच्या निकालांचे यशस्वी चित्रण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.आय. राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मॉडर्न इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक निलेश सूर्यवंशी यांनी मानले.
0 Response to "तळोदा पी.ई. सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा"
टिप्पणी पोस्ट करा