हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंहजींच्या ४८५ व्या जयंतीनिमित्त तळोद्यात प्रतिमा पूजन व अभिषेक सोहळा
तळोदा – हिंदू सूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४८५ व्या जयंतीनिमित्त तळोदा तालुक्यातील शहरात समस्त हिंदू समाजाच्या सान्निध्यात भव्य प्रतिमा पूजन, दुग्धाभिषेक आणि पुष्पार्पण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
वैदिक पद्धतीने पंडित लक्ष्मीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रपुष्पांजली आणि दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले. या सोहळ्यात हिंदू समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुराष्ट्र सेना यांचे प्रांत व प्रखंड पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोषणांच्या जयघोषात कार्यक्रमाचा परिसर हिंदुत्वाच्या स्फूर्तिदायक घोषणांनी दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित वक्त्यांनी महाराणा प्रतापसिंहजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, साहस, पराक्रम आणि हिंदू राष्ट्र उभारणीतील योगदानाच्या प्रेरणादायी गाथा प्रभावी शब्दांत मांडल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षत्रिय राजपूत समाज व समस्त हिंदू समाजातील कार्यकर्त्यांनी अत्यंत मोलाचे परिश्रम घेतले.
0 Response to "हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंहजींच्या ४८५ व्या जयंतीनिमित्त तळोद्यात प्रतिमा पूजन व अभिषेक सोहळा"
टिप्पणी पोस्ट करा