जातनिहाय जनगणना म्हणजे ऐतिहासिक पाऊल — मोड ग्रामस्थांचा मोदी सरकारला पाठिंबा
तळोदा : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि स्वागतार्ह असल्याचे मत मोड गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे देशातील सर्व समाजघटकांना समता व न्याय मिळवून देण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात बोलताना भाजप किसान मोर्चा जिल्हा महामंत्री श्री. प्रविणसिंह राजपूत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे."
गावातील नागरिकांशी संवाद साधताना श्री. राजपूत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आणि मोड ग्रामस्थांतर्फे त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. गावकरी देखील या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत असून, आगामी काळात या जनगणनेत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
0 Response to "जातनिहाय जनगणना म्हणजे ऐतिहासिक पाऊल — मोड ग्रामस्थांचा मोदी सरकारला पाठिंबा"
टिप्पणी पोस्ट करा