तळोदा सरपंच युनियनच्या अध्यक्षपदी मोग्या वळवी, उपाध्यक्षपदी राजू प्रधान
तळोदा : मंगळवारी शहरातील मारुती मंदिरात सरपंच संघटनेची सामूहिक बैठक पार पडली. यामध्ये तालुक्यातील विविध गावांतील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढील कार्यकालासाठी नवी कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत तळवे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. मोग्या पाडवी यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच दलेलपूरचे सरपंच राजू प्रधान यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी काळात युनियनच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
0 Response to "तळोदा सरपंच युनियनच्या अध्यक्षपदी मोग्या वळवी, उपाध्यक्षपदी राजू प्रधान"
टिप्पणी पोस्ट करा