
कुबेरेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम
शहादा : येथील वडनेरे नगरमधील कुबेरेश्वर महादेव मंदिर परिसरात २२ मे रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम सप्तश्रृंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल उर्फ डिगीसेठ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपाचे सतिष जव्हेरी, पत्रकार अजबसिंह गिरासे, राजेंद्र उमराव, सुभाष चित्रकथे, प्रसाद फळे आणि सिद्धांत बडगुजर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मंदिर ट्रस्टतर्फे राजेंद्र अग्रवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि परिसरातील नागरिकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना राजेंद्र अग्रवाल यांनी मंदिर परिसरातील रस्त्यावर मुरुम टाकून परिसर सुधारण्याचे आश्वासन दिले. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला...
0 Response to "कुबेरेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम"
टिप्पणी पोस्ट करा